मुतखडा नैसर्गिकरित्या वितळवण्यासाठी हे घरगुती उपाय करुन पहा

पोटदुखीचा त्रास उद्भवू लागला की, सामान्यत: आपल्याला कळत नाही.
Kidney stone problem
Kidney stone problem ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : पोटदुखीचा त्रास उद्भवू लागला की, सामान्यत: आपल्याला कळत नाही. कामाच्या गडबडीत किंवा दुर्लक्ष झाल्यास आपण पाणी पित नाही. त्यामुळे पोटात दुखू लागते व नंतर लक्षात येते की, आपल्याला मुतखडा झाला आहे.

हे देखील पहा -

मुतखडा हा अधिक त्रास देणारा आजार आहे. याचा त्रास कमी होण्यासाठी बरेचदा शस्त्रक्रिया करावी लागते. तसेच त्यावर काही औषधोपचार करुन ही आराम मिळत नाही. मूत्रपिंडात किंवा लघवीच्या ठिकाणी कठीण खडकासारखा पदार्थ निर्माण होतो त्यामुळे अधिक त्रास होऊ लागतो. रक्तात युरिक अॅसिडचे प्रमाण अधिक वाढल्यास मुतखडा अधिक होण्याची शक्यता असते. त्यावर घरगुती उपचार कशा पध्दतीने करता येईल हे पाहूया.

१. मुतखडा झाल्यानंतर आपण आपल्या आहारात लिंबूमध्ये सायट्रिकचे प्रमाण सर्वाधिक असते. लिंबू हे मुतखडा तयार होण्यापासून प्रतिबंधित करते. इतर फळांमध्ये ऑक्सलेट असते परंतु, त्यात सायट्रिकचे प्रमाण कमी असते. त्यासाठी लिंबूचे सेवन नियमित करावे.

Kidney stone problem
Side effects of cheese : चीजचे सेवन करताय तर त्याच्या दूष्परिणामाविषयी देखील जाणून घ्या

२. आपल्या प्रत्येक अवयवांच्या कार्यासाठी पाणी (Water) अधिक आवश्यक आहे. मूत्रपिडांना मूत्र तयार करण्यासाठी पाण्याची आवश्यकता अधिक असते. आपल्या शरीरातील वाईट पदार्थांना पाण्यामार्फत बाहेर काढण्यास मदत करते त्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.

३. डाळिंबाचा वापर अल्सर आणि अतिसारासह आजार बरा करण्यासाठी केला जातो. त्याचा वापर आपण मुतखडा बरा करण्यासाठी करु शकतो. डाळिंबात असणारे गुणधर्म लघवीत असणारी आम्लाची पातळी कमी करण्यास मदत करते.

४. राजमा हे मुतखड्यावर प्रभावी आहे. किडनी स्वच्छ (Clean) करण्यासाठी व त्यातील विघटक घटक बाहेर फेकण्यासाठी याचा अधिक उपयोग होतो. राजमामध्ये प्रथिने जास्त असतात आणि त्यात विरघळणारे फायबरचे मिश्रण समाविष्ट असते. त्यामुळे पचनसंस्थेसाठी निरोगी असते.

५. आरोग्य सुधारण्यासाठी व्हीटग्रासचे सेवन असंख्य पोषक तत्वांनी समृध्द आहे. व्हीटग्रास लघवीचा प्रवाह वाढवते व मूतखडा निघून जाण्यास मदत करेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com