Pune Fraud Saamtv
मुंबई/पुणे

Pune Fraud: डेटिंग ॲपवर ओळख, सुंदर तरुणीच्या जाळ्यात फसला; लॉजवर भेटायला बोलावले अन्.. तरुणासोबत घडलं भयंकर

Pune Fraud News: पोलिसांनी या प्रकरणी नितीश सिंग आणि पूजा भट या दोघांना अटक केली आहे.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Dating App Fraud Pune:

सीकिंग एडवेंचर या डेटिंग साईटवर अनोळखी मुलीशी चॅटिंग करणे पुण्यातील एका 36 वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणीने तरुणाला तब्बल ९०,००० रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित तरुणी आणि एका तरुणास अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी आणि तरुणीची एका डेटिंग साईटवर ओळख झाली. या तरुणीने आपले फोटो टेलिग्रामवर पाठवत तरुणाला भेटायचे असल्याचे सांगितले. तरुणीच्या या जाळ्यात फसलेल्या तरुणानेही भेटण्याची तयारी दर्शवली आणि शहरातील एका हॉटेलमध्ये रुम बूक केली. (Pune News)

त्याआधी तरुणीने फिर्यादी तरुणाला १२ हजार रुपये स्वतःच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यास सांगितले. तरुणीच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाने लगेच पैसेही पाठवले. मात्र त्यानंतर तरुणीची मागणी वाढत गेली आणि तिने आणखी ३८ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी मात्र फिर्यादीने पैसे ट्रान्सफर करण्यास नकार दिला. यावर आरोपी तरुणीने हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या एका व्यक्तीला आतमध्ये बोलावले. त्या व्यक्तीने आत आल्यानंतर फिर्यादीला मारहाण करत जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या घटनेनंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी नितीश सिंग आणि पूजा भट या दोघांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : सांगलीत पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

मसाज पार्लरच्या आड सेxxx रॅकेट; तरूणींना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकललं, नवी मुंबईत ६ युवतींची सुटका

Bigg Boss 19: फिनाले वीकमध्ये गौरव खन्नाला ढसाढसा रडला; 'त्या' प्रश्नामुळे स्पर्धकाच्या डोळ्यात आलं पाणी

बीडमध्ये माजी आमदाराच्या घरावर दगडफेक, गाड्यांच्या काचा फोडल्या, शेकडो पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, भाजपविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT