Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : उज्वला वारुळे मृत्यूप्रकरण! ती आत्महत्या नव्हती तर..., ओढणीमुळे कोडं उलगडलं, नेमकं काय घडलं?

Pune Crime News : पुण्यातील वाघोली येथे नागनाथ आणि उज्वला या वारुळे दांपत्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. आता या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

पुण्यातील आव्हाळवाडीच्या वाघोली येथील वारुळे दांपत्याने आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केली होती. राहत्या घरात दांपत्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली होती. पण पोस्टमार्टममधून मृत्यूसंबंधित नवी माहिती समोर आली आहे. पतीने पत्नीला मारहाण करुन तिचा गळा आवळला. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. धक्कादायक माहितीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नागनाथ वारुळे (वयवर्ष ४३) आणि त्यांची पत्नी उज्वला वारुळे (वयवर्ष ४०) यांनी आर्थिक विवंचेनेतून आत्महत्या केल्याचे सुरुवातीला म्हटले जात होते. वाघोली येथील बाजारात वारुळे दांपत्य फळ विक्री करण्याचे काम करत होते. काबाडकष्ट करुन दोघांचा संसार सुरु होता. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात होता.

उज्वला यांच्या अंगावरील खुणा, मारल्याचे घाव; तसेच घटनास्थळी आढळलेला लोखंडी हातोडा, चाकू आणि रक्ताने माखलेली ओढणी यावरुन नागनाथ यांनीच त्यांच्या पत्नीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. उज्वला यांची हत्या केल्यानंतर नागनाथ वारुळे यांनी स्वत:चा जीव घेतला अशी नवी माहिती समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मृत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागनाथ यांनी उज्वला यांची हत्या करुन आत्महत्या केली. यामागे आर्थिक अडचणी हे कारण आहे अशी शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. तरीही या घटनेचे खरे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. वाघोली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आसपासच्या परिसरात या घटनेची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज! जुनी पेन्शन संदर्भात मोठा निर्णय, कुणाला होणार लागू? वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

SCROLL FOR NEXT