दारु पिऊन नवरा बनला सैतान; बेदम मारहाण करुन बायकोला छतावरुन उलटं लटकवलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Crime Case : तरुणाने दारु पिऊन त्याच्या बायकोला मारहाण केली. तिला घराच्या छतावर खाली फेकण्याचा प्रयत्न केला. तिला छतावर उलटे लटकवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Crime News
Crime NewsX
Published On

एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत त्याच्या बायकोला बेदम मारहाण केली. त्यानंतर बायकोला त्याने छतावरुन उलटे लटकवून ठेवले. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक घटनास्थळी पोहोचले. याच दरम्यान तरुणाने तिला छतावरुन सोडून दिले. त्या महिलेला वेळीच लोकांनी पकडून खाली उतरवले. मारहाणीमुळे महिलेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या भावाने तिच्या पतीसह चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ही घटना बरेलीमध्ये घडली आहे.

पीडित महिलेचे नाव डॉली असून तिच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात त्याने '१२ वर्षांपूर्वी माझ्या बहिणीचं, डॉलीचं लग्न नितीन सिंगशी झालं होतं. नितीनला दारु पिण्याचं व्यसन होतं. तो दररोज दारु पिऊन घरी येतो आणि डॉलीला मारहाण करतो. डॉलीच्या आईवडिलांनी समजावून सुद्धा नितीनचे दारु चे व्यसन सुटले नाही, नितीन दारु पिऊन डॉलीला मारायचा', असे म्हटले आहे.

Crime News
Pahalgam हल्ल्यात सर्वात मोठा खुलासा! अमेरिकेनं भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय? कसा रचला पहलगामचा कट?

'१३ मे रोजी रात्री १० च्या सुमारास नितीनने डॉलीला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला छतावरुन उलटे लटकवले. तिला छतावरून खाली सोडून दिले. डॉलीला संपवण्याचा नितीनचा हेतू होता. सुदैवाने शेजारच्या लोकांनी डॉलीला वेळीच पकडले', अशी माहिती डॉलीच्या भावाने पोलिसांना दिली. डॉलीचा पती नितीन कुमार, अमित कुमार आणि दोन महिलांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कण्यात आली आहे. नितीन सिंग सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Crime News
Viral Video : भाजपच्या आमदाराने तिरंग्यानं पुसलं नाक, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यानं नेटकऱ्यांचा संताप

या घटनेचा व्हिडीओ नितीन आणि डॉलीच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने फोनमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नितीन डॉलीला छतावरुन उलटे लटकवून खाली फेकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. व्हिडीओत डॉली मोठ्याने आरडाओरड करत असल्याचे पाहायला मिळते.

Crime News
8 कोटींची कॅश अन् 23 कोटींचं सोनं...; वसई विरार मनपा अधिकारी ईडीच्या जाळ्यात सापडला, मोठा घोटाळा समोर आणला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com