लोणावळ्यात आजोबाने घेतला नातवाचा जीव
अभय मराठे या तरुणाची गोळ्या झा़डून हत्या
पुण्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा रायफलच्या गोळीने मृत्यू
लोणावळा भुशी येथे घडली घटना
आरोपी आजोबाला पोलिसांकडून अटक
पुण्यामध्ये प्रॉपर्टीच्या वादातून आजोबानेच नातवाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली. ८३ वर्षीय आजोबाने गोळ्या झाडून नातवाला संपवलं. हत्या झालेला तरुण हा शिवसेना नेत्याचा मुलगा होता. ही घटना पुणे जिल्ह्यातील लोणावळा भागात घडली. ही घटना घडली तेव्हा हा अपघात असल्याचे भासवण्यात आले होते. पण पोलिस तपासातून हे हत्याकांड असल्याचे समोर आले. रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली होती. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या तपासातून आजोबांनीच नातवाचा खून केल्याचं निष्पन्न झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभय माणिक मराठे (३३ वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. ही घटना लोणावळ्यातील भुशी गावातील हॉटेल मोतीरामच्या आवारात घडली. अभय मराठे हे लोणावळा शहराचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक माणिक मराठे यांचे सुपुत्र होते. हा सगळा प्रकार ५ ऑक्टोबर रोजी घडला. आजोबांची रायफल साफ करताना अभय मराठे यांना गोळी लागली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेत ते गंभीर जखमी झालेल्या मराठे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला या प्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र मृतदेहाचे शवविचेदन सुरू असताना पोलिसांना या प्रकरणाचा संशय आला. मृतदेहाची पाहणी करताना रायफलमधून गोळीबार झाला तर थेट पोटात छिद्र पडलं असं दिसलं आणि हा गोळीबार असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तात्काळ हॉटेल मोतीराम येथील कार्यरत असलेल्या वेटर आणि इतर लोकांची चौकशी केल्यानंतर अभय मराठे यांचा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचं स्पष्ट झालं. तपासादरम्यान, अभय यांचे आजोबा मोतीराम मराठे (८३ वर्षे) यांनीच गोळीबार करून त्याची हत्या केल्याचं समोर आलं.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीराम मराठे आणि त्यांचे नातू अभय मराठे यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता. ५ ऑक्टोबर रोजी सुद्धा त्यांच्यात एक व्यवहारातून वाद झाला. आजोबा मोतीराम यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या परवानाधारक रायफलमधून अभयच्या छातीत गोळी झाडली. छातीत गोळी घुसल्याने अभय गंभीर जखमी झाले आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अभयच्या आजोबाला अटक केली. गुन्ह्यांतर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तसेच आजोबा मोतीराम मराठे यांना वाचविले प्रकणारी कुटुंबातील आणखी ५ जणांविरोधातगुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.