मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला दणका; उल्हासनगरातील स्वीकृत नगरसेवक निवडणूक स्थगित

Ulhasnagar Corporation : उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडणुकीवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाआधी मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी नवीन विशेष सर्वसाधारण सभा घेऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
Ulhasnagar Corporation
Supreme Court case involving Ulhasnagar nominated corporator electionsaam tv
Published On
Summary
  • उल्हासनगर स्वीकृत नगरसेवक निवडणुकीचे ताजे अपडेट

  • उल्हासनगर स्वीकृत नगरसेवक निवडणूक न्यायालयीन वाद

  • सर्वोच्च न्यायालयात उल्हासनगर स्वीकृत नगरसेवक प्रकरण

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

उल्हासनगर महानगरपालिकेत मोठी घडामोड घडत आहे. महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय. २२ सप्टेंबर रोजी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ सप्टेंबरला निवडणूक होणार होती. मात्र पद रद्द करण्यात आलेले शिवसेनेचे नगरसेवक विकी लबाना आणि पूजा भोईर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला २८ सप्टेंबर रोजी दोन्ही नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आदेश दिलेत.

यापूर्वी निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याविरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर २५ सप्टेंबरपूर्वी निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार नामनिर्देशन दाखल झाले असून भाजपकडून ४, तर शिवसेनेकडून २१ अर्ज दाखल झाले आहेत.आता २८ सप्टेंबरच्या उच्च न्यायालयातील सुनावणीनंतरच पुढील निर्णय स्पष्ट होणार आहे.

Ulhasnagar Corporation
BJP Prabhari list: भाजपने भाकरी फिरवली! पक्षात मोठा फेरबदल; महाराष्ट्रातील ४ नेत्यांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

मनपा सचिव कार्यालयात २२ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी व स्वीकृती प्रक्रिया पार पडलीय. उद्या २४ सप्टेंबर रोजी या निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ७ जागांसाठी तब्बल ४१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय.

Ulhasnagar Corporation
भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम, तडकाफडकी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

​संख्याबळाच्या जोरावर भाजपच्या कोट्यातील ४ जागांवर धनंजय बोडारे, बाळा श्रीखंडे, कपिल अडसूळ आणि प्रदीप रामचंदानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पुरेसे संख्याबळ पाठीशी असल्याने या चारही नेत्यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात होतं, परंतु आता न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजप नेत्यांची धडधड वाढलीय. ​दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडे ३ स्वीकृत नगरसेवकांचा कोटा उपलब्ध आहे. मात्र, शिवसेना, साई पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचा समावेश असलेल्या 'उल्हासनगर शहर विकास आघाडी'कडून अनेक इच्छुकांनी अर्ज भरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com