Pune Prostitution Racket Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ४ परदेशी तरुणींनी नको त्या अवस्थेत पकडलं

Pune Prostitution Racket: पुण्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकली. याठिकाणी एका फ्लॅटमध्ये पोलिसांनी ४ तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं.

Priya More
  • पुणे पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला

  • एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकला

  • ४ परदेशी तरुणींना पोलिसांनी नको त्या अवस्थेत पकडलं

पुण्यामध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात विदेशी तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये हे सेक्स रॅकेट सुरू होते. पोलिसांनी धाड टाकत ४ तरुणींची सुटका केली. या चारही तरुणी केनिया देशातील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या तरुणींकडून वेश्या वसाय करवून घेणाऱ्या एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरात परदेशी तरुणींकडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने कारवाई केली. कोरेगाव पार्कमधील लिबर्टी सोसायटीत हा वेश्या व्यवसाय सुरू होता. याठिकाणी परदेशी तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री केल्यानंतर छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी केनियातील ४ तरुणींना एका फ्लॅटमध्ये नको त्या अवस्थेत पकडलं.

या तरुणी वेश्या व्यवसाय करत असल्याचे पोलिसांना आढळून आल्यानंतर त्यांनी त्यांची सुटका केली. पोलिस सध्या या तरुणींची चौकशी करत आहेत. या सेक्स रॅकेटमागे कुणाचा हात आहे त्याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT