Shocking: उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ३ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

Jalgaon Crime: जळगावमध्ये पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी ३ महिला आणि एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं. पोलिस सध्या तपास करत आहेत.
Shocking: उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ३ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं
Jalgaon CrimeSaam Tv
Published On
  • जळगावमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

  • निमखेडी रोडवरील अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पोलिसांची धाड

  • जळगावमध्ये पोलिसांची मोठी कारवाई

  • ३ महिला आणि एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

संजय महाजन, जळगाव

जळगाव शहरात हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. जळगावच्या निमखेडी रोडवरील उच्चभ्रू सोसायटीत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३ महिला आणि १ पुरुषाला नको त्या अवस्थेत पकडलं. या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. या सेक्स रॅकेटमागे कुणाचा हात आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावात पुन्हा एकदा रहिवासी भागात सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे काळे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. जळगाव शहरातील निमखेडी रोडवर असलेल्या ब्रह्मांड नायक या अपार्टमेंटमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धाड टाकली. या ठिकाणी सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक घटनास्थळी धाव घेत धाड टाकली.

Shocking: उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ३ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं
Shocking : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अभिनेत्रीला ठाण्यात अटक, ज्युनिअर कलाकारांना फसवायची अन्..

पोलिसांनी या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमधून तीन महिला आणि एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडले. या चौघांची पोलिस चौकशी करत आहेत. जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या’ (AHTU) पथकाने ही मोठी कारवाई केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या सेक्स रॅकेटच्या मुख्य सुत्रधाराचा शोध घेत आहेत.

Shocking: उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ३ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं
Pune : लॉजच्या बंद रूममध्ये मुली नको त्या अवस्थेत, पोलिसांनी छापा टाकताच उघडं पडलं सेक्स रॅकेट; पुण्यातील घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com