Pune Hadapsar Police Station Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime: धक्कादायक! कुटुंबीयांकडे तक्रार केल्याचा राग, मित्रानेच मित्राचा काटा काढला

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर भागामध्ये एका तरुणाची हत्या झाली होती. या हत्येच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. व्यसन करत असल्याची माहिती कुटुंबीयांना सांगितल्याचा राग मनात ठेवून या तरुणाचा मित्रानेच काटा काढला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेमुळे हडपसरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमध्ये १९ सप्टेंबर रोजी अमोल ऊर्फ भावड्या मारुती माने (वय ३९ वर्षे) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. गुरुवारी अमोल माने रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अमोलला तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेप्रकरणी हडपसर पोलिसांनी तपास सुरू केला असता. अमोलची हत्या लबडे आणि त्याचा साथीदार सकट यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं. दोघांची देखील कसून चौकशी केली असता त्यांनी अमोलची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी व्यसन करत असल्याची माहिती अमोलने पत्नी आणि त्याच्या आईला दिल्याच्या रागातून त्याने त्याची हत्याच केली.

आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने अमोलची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमोलचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी वैभव गणेश लबडे (वय ३१, रा. हिंगणे आळी, हडपसर), ज्ञानेश्वर दत्तू सकट (वय २७, रा. रामोशी आळी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. पोलिस या प्रकरणाा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे अमोल मानेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : डोंबिवलीतील लोढा परिसरात काही फेरीवाल्यांना मारहाण, गाड्यांची तोडफोड

Nashik Crime : पतीच्या लटकत्या मृतदेहाखाली पत्नीची दुर्गापूजा? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Maharahstra Politics: रश्मी ठाकरे भावी मुख्यमंत्री; मातोश्रीच्या परिसराबाहेरील बॅनरमुळे चर्चांना उधाण

Chess Olympiad: भारत बनला चॅम्पियन; पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदक जिंकत रचला इतिहास

Mumbra building slab collapse : मुंब्र्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, ५ वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT