Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Pune Crime News : पुण्यात एका ६ वीत शिकणाऱ्या मुलीवर दोन वर्षांपर्वी नात्यातीलच तुरुणाने इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं आणि नंतर अत्याचार केले होते. गुड टच बॅड टच अभियानातून हा प्रकार समोर आला आहे.
Pune Crime
Pune Crime Saam Digital
Published On

गेल्या काही दिवसात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्रासह देश हादरून गेला आहे. एकामागून एक घटना समोर येतायेत. या घटना ताज्या असतानाच पुण्यात आणखी एक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलींवर नातेवाईक तरुणाकडूनच लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे त्या नराधमाने इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून अत्याचार केले आहेत.

२ वर्षापूर्वी घडलेला भयानक प्रकार पिडीत मुलीने शिक्षकांना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. शाळेतील सुरू असलेल्या गुड टच बॅड टच अभियानामुळे पीडित मुलीला धीर आला आणि तिने घडला प्रकार शिक्षकांना सांगीतला. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पीडित मुलीच्या नात्यातच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली. त्यावेळी पीडित मुलगी इयत्ता सहावीत शिकत होती. आरोपी तरुणाने या मुलीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना जर कोणाला सांगितली तर त्या ठिकाणचे फोटो व्हायरल करेन अशी धमकी सुद्धा त्याने दिली होती.

Pune Crime
Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

२ वर्षानंतर जेव्हा पीडित मुलगी ज्या शाळेत शिकतेय तिथे 'गुड टच बॅड टच' अभियानाचे आयोजन केले होते. या उपक्रमामुळे या मुलीला धीर आला आणि तिने समोर जाऊन शिक्षकांना दोन वर्षांपूर्वी आपल्यासोबत जे घडलं ते सांगितलं. शिक्षकांनीही या मुलीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर पीडित तरुणीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे.

Pune Crime
Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com