Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Thane Crime : ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील कोळसेवाडी भागातील एका निवासी सोसायटीत १८ महिन्यांच्या बाळाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. कोणतेही ठोस पुरावे नसताना त्यांनी या खुनाचा छडा लावला आहे.
Thane Crime News
Thane Crime News social media
Published On

गुन्हा करणारा कितीही चलाख किंवा शातीर असला तरी मागे काही ना काही सुगावा सोडतोचं. कल्याणमध्येही अशीच एक घटना घडली आहे. एका १८ महिन्यांच्या बाळाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. पोलिसांकडे ना सीसीटीव्ही फूटेज होतं ना कोणते ठोस पुरावे मात्र पोलिसांनी हार मानली नाही, अखेर कित्येक आव्हानांचा पाठलाग करत पोलिसांनी या खूनाचा छडा लावला आहे. नक्की काय घडलं होतं आणि इतक्या लहान मुलाची इतक्या निर्घुणपणे का हत्या करण्यात आली. पोलिसांनी कसा केला प्रकरणाचा पाठलाग जाणून घेऊया..

मनीष नदगे घाटकोपरमधील एका IT कंपनीत हार्डवेअर इंजिनिअर होते. ते पत्नी संगाती मुलगी श्वेता, मुलगा श्रेयस आणि संगीताच्या आईसोबत ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील कोळसेवाडी भागातील एका निवासी सोसायटीत राहत होते. मात्र १५ जुलै रोजी सकाळी, मनीष कामावर निघून गेले आणि संगीता नोकरीच्या मुलाखतीसाठी गेली होती. श्वेता आणि संगीताची आई घरात होत्या आणि श्रेयसची काळजी घेत होत्या. याचवेळी उषा लांडगे म्हणजे श्रेयसची आजी नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी शेजार्‍यांसह गेली होती आणि श्वेता तिच्या मित्रांसोबत खेळण्यासाठी बाहेर गेली.

थोड्या वेळाने श्वेता परत आली मात्र श्रेयस कुठे दिसला नाही. तिने आपल्या आजीला सांगितलं आणि दोघीही श्रेयसला शोधू लागल्या. शेजार्‍यांकडे विचारपूस केली. प्रशांत शिंदे, जो नदगे त्यांच्या फ्लॅटसमोर राहत होता, त्यांनीही शोधण्यात मदत केली. शिंदे कुटुंब श्रेयसला खूपच जवळचे होते. श्रेयस त्यांच्याकडे रोज रांगत जात असे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबालाही त्याचा लळा लागला होता. त्यांची मुलगी नंदिनी शिदे जी तरुण फॅशन डिझायनर होती, तिलाही याची बातमी समजली आणि ती देखील श्रेयसचा शोध घेऊ लागली. मात्र श्रेयसचा कुठेही थांग पत्ता लागत नव्हता. एक रांगणारं मुलगं कठे गेलं असेल काही संमजत नव्हतं.

नंदिनीने संगीतालाही फोन करून माहिती दिली. संगीता त्वरित घरी परतली. काही वेळात मनीषही घरी परतला, आणि संपूर्ण कुटुंब व शेजारी सोसायटीत आणि आजूबाजूच्या परिसरात श्रेयसचा शोध घेऊ लागले, मात्र काहीच उपयोग झाला नाही.काही तासांनंतर कुटुंबाने कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, निरीक्षक जगदीश लोहळकर यांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आणि त्वरित शोध पथके तयार केली. त्यावेळी आताच्यासारखे सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक ठिकाणी नव्हते त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान होतं. केवळ माहिती आणि तपास कौशल्यांवर या प्रकरणापर्यंत पोहोचायंच होतं.

Thane Crime News
Explainer: लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

पोलीस पथकांनी नदगे कुटुंब, शिंदे कुटुंब, इतर शेजारी आणि सोसायटीतील रहिवाशांशी बोलून परिसरात अलीकडे काही संशयास्पद घडले आहे का याची माहिती घेत होते. नंदिनीने पोलिसांना सांगितले की सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या सोसायटीत एक तांत्रिक आला होता, आणि काही दिवसांपूर्वी तिने त्याला पुन्हा पाहिले होते.

पोलिसांना आता पहिला धागा मिळाला होता, आणि पथकांनी त्या दिशेने काम करायला सुरुवात केली. त्यांनी अनेक रहिवासी, विक्रेते, दुकानदार, आणि डिलिव्हरी बॉय यांना त्या तांत्रिकाबद्दल विचारपूस केली, पण याचा काहीही उपयोग झाला नाही. पोलिसांना संशय आला की नंदिनी मुद्दाम चुकीची माहिती देऊन तपासाला चुकीच्या दिशेने नेत आहे. दुसऱ्या दिवशी त्यांना माहिती मिळाली की नंदिनी एका पिशवीसह सोसायटीच्या बाहेर गेली आहे. थेट पुरावा नसल्यामुळे पोलिसांनी संगीतालाच नंदिनीला फोन करण्यास सांगितले. नंदिनीने सांगितले की ती तिच्या मैत्रिणीकडे पिशवी देण्यासाठी गेली आहे. पोलिसांना तिच्या या कारणावर विश्वास बसला नाही आणि एका पोलीस अधिकाऱ्याने तिचा पाठलाग करून तिला परत येताना पकडलं.

पोलीस अधिकाऱ्याने नंदिनीला पिशवीबद्दल विचारले, तेव्हा तिने सांगितले की ती पिशवी आपल्या मैत्रिणीला दिली आहे आणि ती घरी परतत आहे. अधिकाऱ्याने नंदिनीला तिच्या मैत्रिणीला फोन करण्यास सांगितले, आणि तिच्याशी बोलून पिशवीबद्दल विचारले. नंदिनीच्या मैत्रिणीने अधिकाऱ्याला पुष्टी दिली की तिनेच पिशवी मागवली होती, कारण ती तिला आवश्यक होती. मैत्रिणीने अधिकाऱ्यांना हेही सांगितले की ती त्यांना पिशवी दाखवू शकते. त्यानंतर पोलिसांनी नंदिनीवर संशय घेतल्याबद्दल तिची माफी मागितली.

पोलिसांना तपासात यश येत नसतानाच, ४८ तासांनी श्रेयसचा मृतदेह कल्याणमधील एका डिझेल कार शेडनजीक निर्जणस्थळी आढळला. श्रेयसच्या वडिलांना मृतदेह ओळखण्यासाठी बोलावण्यात आलं आणि त्यांनी तो त्यांचा मुलगा असल्याची पुष्टी केली. पोस्टमॉर्टेम तपासणीत मुलाचा गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. मृतदेह सापडल्यानंतर, तपास अधिकाऱ्यांवर प्रकरण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रचंड दबाव आला. त्यांनी श्रेयसचा मृतदेह जिथे सापडला त्या ठिकाणाजवळ शोधमोहीम सुरू केली. या शोधादरम्यान पोलिसांना अनेक वस्तू सापडल्या, ज्यात एक पिवळसर रंगाचा ओढणी होती, जी संभाव्य पुरावा म्हणून पाहिली जात होती. पोलिसांनी सर्व वस्तू, तसेच ओढणी संगीता, सोसायटीतील सर्व लोक आणि शेजाऱ्यांना दाखवली. पण कोणालाच त्या वस्तू ओळखता आल्या नाहीत, ज्यामुळे पोलिसांना पुन्हा अपयश आलं.

मुलाच्या अंतिम विधी केल्याच्या दुसऱ्या दिवशी, संगीता आणि तिचे पती पोलिसांकडे गेले, आणि तिने पोलिसांना त्या वस्तू, विशेषतः ओढणी पुन्हा दाखवण्याची विनंती केली. ती पुन्हा पाहिल्यानंतर, संगीता पोलिसांना सांगितले की तिने नंदिनीला खूप पूर्वी अशीच ओढणी घातलेली पाहिली होती. पोलिसांनी वेळ न घालवता नंदिनीच्या घरी धाड टाकली आणि ओढणीच्या डिझाइनशी मिळता जुळता पायजमा जप्त केली. नंदिनीला ताब्यात घेतलं. तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि ओढणी व पायजमा दाखवण्यात आला. पण ती कबूली देत नव्हती अखेर पोलिसी खाक्या दाखवताच खून केल्याची कबुली दिली.चौकशीत नंदिनीने सांगितले की श्रेयसची आजी लांडगे नेहमीच तिच्या आईवडिलांना तिच्या लग्नाबद्दल विचारत असे. ती तिला टोमणे मारत असे आणि तिच्या चारित्र्यावरही संशय घेत असे. या अपमानामुळे नंदिनीने बदला घेण्याचं ठरवलं आणि तिने श्रेयसची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

१५ जुलै रोजी, जेव्हा श्रेयसची आजी पाणी भरण्यात व्यस्त होती आणि श्वेता खेळत होती, तेव्हा तिने श्रेयसला तिच्या घरी नेले. तिने श्रेयसला खोलीत नेऊन त्याचे तोंड दाबले आणि गळा आवळून खून केला. जेव्हा सर्वजण त्याचा शोध घेत होते, तेव्हा तिने नदगे कुटुंबाला सांगितले की तो तिच्या घरी आलेला नाही. दुसऱ्या दिवशी तिने मुलाच्या शरीरावर जुनी ओढणी गुंडाळली, त्याला एका पिशवीत टाकून कल्याणमधील कार शेडजवळ फेकून दिले, आणि ती पिशवी तिच्या मैत्रिणीला दिली. तिने मैत्रिणीला खोटी गोष्ट सांगितली आणि जर कोणी विचारले तर तिने ती पिशवी तिला दिल्याचे सांगावं, असं सांगितलं आणि हाच खरा पुरावा ठरला, असं पोलिसांनी सांगितलं.

Thane Crime News
Explainer: लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com