Pune Crime News saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: बंद पेटी, हात-पाय बांधलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह, भयंकर घटनेने पुणे हादरलं; हडपसरमध्ये काय घडलं?

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे

Pune Hadpsar Crime: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात वारंवार खून, दरोडे, मारामारीच्या घटना घडताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच शहरातील हडपसर भागात एका बंद पेटीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाची हत्या करुन पेटीत फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हडपसरमध्ये हिंगणे मळा परिसरात एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह पेटीत बांधून फेकून दिल्याची घटना शुक्रवारी (ता. १२ ऑक्टोबर) दुपारी उघडकीस आली. एका अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह एका पेटीत बंद करून हिंगणे मळा कॅनॉलच्या शेजारी फेकून देण्यात आला.

हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. हडपसर पोलीस ठाण्यातील आणि श्वान पथकातील पोलिस अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी भेट दिलीय. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, एक दिवसापूर्वीच दौंड तालुक्यातील लिंगाळी येथे एका तरूण व्यावसायिकाच्या खुनाची घटना उघडकीस आली होती. अमोल सुभाष साळुंखे ( वय ३३ , रा. लिंगाळी , ता. दौंड) असं खून करण्यात आलेल्या व्यवसायिकाचं नाव आहे. ० ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान हा खून झाला. अमोल साळुंखे बोरावकेनगर येथील दुकान बंद करून घरी जात असताना बोरावकेनगर ते लिंगाळी रस्त्यालगत राखीव वन क्षेत्रात निर्जन ठिकाणी हा खून करण्यात आला. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Siddique Accuse EXCLUSIVE: बाबा सिद्दिकींवर गोळी झाडणारा हाच 'तो' आरोपी; पाहा व्हिडिओ

Baba Siddique Death : घटनेची जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी पायउतार व्हावे, महायुती सरकारवर शरद पवार संतापले

Who is Baba Siddique: नगरसेवक ते मंत्री.. मुंबईमधील बाहुबली नेता, बॉलिवूडमध्येही दबदबा; कोण होते बाबा सिद्दीकी?

CM Eknath Shinde : बाबा सिद्धिकी यांच्या हत्येचं हरियाणा आणि उत्तर प्रदेश कनेक्शन उघड; मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले कारवाईचे आदेश

Baba Siddiqui Firing: मुलाच्या कार्यालयाबाहेरच मारेकऱ्यांनी झाडल्या गोळ्या, असा घडला बाबा सिद्धिकींवरील गोळीबारचा थरार

SCROLL FOR NEXT