Titwala Crime : ५० रुपयांची फाटकी नोट का दिली? टिटवाळ्यात रिक्षाचालकाच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू

Titwala Crime news : टिटवाळ्यात रिक्षाचालकाच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा घटना घडली आहे. प्रवाशाच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
५० रुपयांची फाटकी नोट का दिली? टिटवाळ्यात रिक्षा चालकाच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू
Titwala CrimeSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

टिटवाळा : टिटवाळ्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षा चालकाला भाडे देण्यासाठी प्रवाशाने 50 रुपयांची नोट दिली. मात्र नोट फाटलेली असल्याने रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यामध्ये टोकाचा वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झालं. या भयंकर मारहाणीत प्रवासी अंशूमन शाही हे खाली कोसळलं. त्यांना उपचारासाठी रुग्णलयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. कल्याण जवळील टिटवाळा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी रिक्षाचालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रिक्षाचालक राजा भोईर याला अटक केली आहे.

कल्याण नजीक टिटवाळा परिसरात असलेल्या हरी ओम व्हॅली इमारत क्रमांक सातमध्ये अंशूमन शाही हे त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांना एक मुलगी आणि पत्नी असं त्यांचं कुटुंब आहे. गुरुवारी रात्री ते रिक्षातून घराजवळ आले. या वेळी त्यांनी प्रवासी भाडे देण्याकरीता ५० रुपयांची नोट काढली. या फाटक्या नोटेवरून रिक्षा चालकाने प्रवाशाला प्रश्न केला. ५० रुपयांची नोट फाटलेली असल्याने रिक्षाचालकाने त्यांच्याशी वाद घातला. या वादात रिक्षा चालक आणि अंशूमन यांच्या हाणामारी झाली.

५० रुपयांची फाटकी नोट का दिली? टिटवाळ्यात रिक्षा चालकाच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू
Crime News: लॉजमध्ये भयंकर कांड! सपासप वार करत गर्लफ्रेंडची हत्या, नंतर प्रियकराने स्वतःला संपवलं; पिंपरी चिंचवडमधील घटना

या हाणामारीत अंशूमन हे बेशुद्ध होऊन खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या संपूर्ण घटनेनंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश कदम यांनी अंशूमन यांचा भांडणानंतर हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती दिली. प्रवाशाच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.

५० रुपयांची फाटकी नोट का दिली? टिटवाळ्यात रिक्षा चालकाच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू
Mumbai Crime: तक्रार करायला गेला अन् परत आलाच नाही, तरुणासोबत पोलिस ठाण्यात नेमकं काय घडलं?

या प्रकरणी रिक्षा चालक राजा भोईर याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com