pune crime news  saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या बंटी-बबलीचा प्रताप उघड, अलिशान फ्लॅट, फार्म हाऊस अन् बरंच काही...

Pune Crime News: पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात आलिशान गाडी देखील जप्त केली आहे.

वृत्तसंस्था

सचिन जाधव, पुणे

Pune Crime News: Pune Crime : पुण्यात एका चोरट्याने आपल्या मेहुणीच्या मदतीने अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे. जवळपास ९८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल या दोघांनी लंपास केला. मात्र अलंकार पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद केले आहे.

पुण्यात (Pune) जयंत इनामदार यांच्या घरी दिवाळीच्या दोन दिवसांनंतर चोरी झाली होती. यावेळी ९८ लाख किंमतीचे हिरे आणि सोन्याचे दागिने चोरी झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत नोंदवली. पुढे तपासात या दोन्ही चोरट्यांचा शोध घेण्यात आता पोलिसांना यश आले आहे. (Pune Crime News)

राजू दुर्योधन काळमेघ आणि सोनिया श्रीराम पाटील अशी दोन्ही चोरट्यांची नावे आहेत. हे दोघेही पुण्यातल्या उच्चभ्रू सोसायटीत राहत होते. चोरीच्या (Theif) पैशांतून त्यांनी फ्लॅट, हॉटेल, फार्म हाऊस आणि पोल्ट्री अशा विविध व्यवसायांत आपले साम्राज्य निर्माण केल्याचे सांगितले जात आहे.

पुण्यातील (Pune) अलंकार पोलिसांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, जयंत इनामदार हे लक्ष्मी पूजनानंतर मुलाकडे राहायला गेले असताना घरफोडी झाली. यावेळी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नव्हता. त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला गेला.

शोध घेत असताना आधी राजू काळमेघला संशयावरून अटक करण्यात आली. त्याच्याकडे चोरीची रक्कम न मिळाल्याने पोलिसांना चौकशी दरम्यान त्याच्या मेहुणीची या गुन्ह्यात साथ असल्याचे समजते. चौकशीत त्याने याची कबुली दिली.

त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात सोनिया श्रीराम पाटीलला अटक केली गेली. ती सर्व मुद्देमाल घेउन मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत होती. चोरी केलेला सर्व मुद्देमाल तिच्याकडे सापडला. पोलिसांनी तिच्याकडून तब्बल १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात आलिशान गाडी देखील जप्त केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT