अफजलखानाच्या विचारांचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

शिवप्रताप दिनी कबरीजवळील अतिक्रमण काढल्याचे व्यक्त केले समाधान
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSaamTV

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू असलेल्या अफजलखानाची कबर, त्याजवळ झालेले अतिक्रमण व त्या माध्यमातून अफजलखानाचे उदात्तीकरण आम्ही कदापी खपवून घेणार नाही. म्हणूनच आज शिवप्रताप दिनी सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी कारवाई करुन अतिक्रमण पाडले अशी प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली. महाराजांना राज्याच्या स्वराज्यहितवादी सरकारकडून हा मानाचा मुजरा आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले. (Sudhir Mungantiwar Latest News)

Sudhir Mungantiwar
Shirdi News: साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! हस्त स्पर्श करुन घेता येणार बाबांच्या समाधीचे दर्शन

प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे. शौर्य, धैर्य आणि महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) चतुराई यासाठी ही लढाई अजरामर ठरली. 10 नोव्हेंबर 1659 हा तो दिवस. आपण तो शिवप्रताप दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आमचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट खानाचा शिताफीने वध करून संपविले. संख्येने दुप्पट-तिप्पट असलेल्या त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले. हा आमच्याकरिता अभिमानाचा विषय आहे.

Sudhir Mungantiwar
Cobra Snake Viral Video: बाप रे बाप! शाळेत आला कोब्रा साप; विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही उडाला थरकाप

परंतु 29 जुलै 1953 मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्यद्रोही अफजलखानाची कबर तयार करण्यात आली आणि एका संस्थेला लीजवर ही जागा देण्यात आली होती. तेव्हापासून शिवप्रेमी जनतेत असंतोष होता. यासाठी अनेकदा आंदोलने झाली, तक्रारी झाल्या अगदी प्रकरण कोर्टापर्यंत गेले. दरम्यान सन 2008 मध्ये सदर जागेची मुदत संपली; त्यानंतरही अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कारवाई झाली नव्हती होती.

अखेर शिवप्रताप दिनाचा मुहुर्त राज्य सरकारने पाहून आज ही कारवाई केली. राज्य सरकारला या कारवाईचे समाधान असून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात यापुढे स्वराज्यद्रोही कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com