Pune Mystery Of Women Body Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : ना डोकं, ना हात, ना पाय; मुठा नदीत सापडलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ उकललं, सख्ख्या भावानेच केला घात!

Pune Mystery Of Women Body: मुठा नदीमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले. त्या महिलेची हत्या करणाऱ्या व्यक्तींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील मुठा नदीमध्ये सापडलेल्या त्या हात-पाय आणि शिर नसलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. त्या महिलेची हत्या करणाऱ्या व्यक्तींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यातील शिवाजीनगर भागातील दोन व्यक्तींनी या महिलेची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. हत्या करणारा व्यक्ती महिलेचा सख्खा भाऊ असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. प्रॉपर्टीसाठी सख्ख्या भावानेच आपल्या पत्नीच्या मदतीने बहिणीचा काटा काढला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली.

२६ ऑगस्ट रोजी पुण्यातील मुठा नदीमध्ये ना डोकं, ना हात, ना पाय असलेला मृतदेह आढळून आला होता. हात-पाय, आणि शिर कापून महिलेचा मृतेदह मुठा नदीमध्ये फेकून देण्यात आला होता. हा मृतदेह नदीवर तरंगत असताना नागरिकांना दिसून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती याप्रकरणाचा गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांकडून तपास सुरू होता. अखेर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत काटेकोरपणे करत पुणे पोलिसांनी छडा लावला आणि आरोपींना अटक केली.

मुठा नदीमध्ये आढळलेला मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा असल्याचे तपासात उघड झाले. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने सकीना खान यांची हत्या केली. त्यानंतर घरातच धारदार शस्त्राने सकीना यांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. पुण्यामध्ये ज्यादिवशी मुसळधार पाऊस झाला त्या दिवशी आरोपींनी सकीनाच्या मृतदेहाचे तुकडे संगमवाडी येथील मुठा नदीपात्रात फेकून दिले.

त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांना दिली. मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी सकिना यांचा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा खान यांना अटक केली. पुण्यातील पाटील इस्टेट भागातील एका खोलीच्या मालकीतून सकीना खान यांची हत्या करण्यात आली होती. ही खोली सकीना यांच्या नावावर होती. सकीना यांचा भाऊ आणि वहिनी वारंवार त्यांना या घरातून निघून जाण्यास सांगत होते. मात्र त्या जात नसल्याने त्यांची हत्या करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT