Crime News : भयंकर! १५ वर्षीय मुलीने वडिलांसह लहान भावाला संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन् फ्रीजमध्ये ठेवले

Jabalpur Double Murder Case : प्रियकरासोबत असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीने वडिलांसह लहान भावाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले अन् फ्रीजमध्ये भरले.
भयंकर! १५ वर्षीय मुलीने वडिलांसह लहान भावाला संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन् फ्रीजमध्ये ठेवले
Jabalpur Double Murder CaseSaam TV

प्रियकरासोबत असलेल्या प्रेमसंबंधांना विरोध केल्यामुळे १५ वर्षीय मुलगी संतापली. तिने प्रियकराच्या मदतीने वडिलांसह लहान भावाची हत्या केली. इतकंच नाही, तर मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना १५ मार्च रोजी मध्य प्रदेशच्या जबलपूर शहरात घडली होती. याप्रकरणी दोन महिन्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे.

भयंकर! १५ वर्षीय मुलीने वडिलांसह लहान भावाला संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन् फ्रीजमध्ये ठेवले
Nashik News : कबूतर शर्यतीवरून वाद, नाशिकमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या; तीन संशयित ताब्यात

तिचा प्रियकर अद्यापही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूर रेल्वेत काम करणाऱ्या राजकुमार विश्वकर्मा आणि त्यांच्या ८ वर्षीय मुलाची १५ मार्च रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. दोघांचेही मृतदेह राहत्या घरातील फ्रीजमध्ये आढळून आले होते.

मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेनं अख्खं शहर हादरवून गेलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता चक्रावून टाकणारी माहिती समोर आली. प्रेमसंबंधांना विरोध केल्याने दहावीत शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीनेच आपल्याच प्रियकराच्या मदतीने वडील आणि भावाची हत्या केल्याचं उघड झालं.

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत अल्पवयीन मुलगी आणि तिचा प्रयकार मुकुल सिंह याचा शोध सुरू केला होता. मात्र, घटनेला अनेक दिवस उलटूनही आरोपींचा शोध लागत नव्हता. हा भयंकर गुन्हा करून अल्पवयीन मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. दोघेही विविध राज्यात फिरून पोलिसांना गुंगारा देत होते.

अखेर अल्पवयीन मुलीला हरिद्वारमधून अटक करण्यात आली आहे. तिचा प्रियकर मुकूल अद्यापही फरारच आहेत. घटनेबाबत बोलताने पोलीस अधीक्षक प्रमींद्र डोबल यांनी सांगितले की, "सदर मुलगी हरिद्वार येथे फिरत असल्याची माहिती आम्हाला स्थानिकांनी दिली. त्यानंतर आम्ही तातडीने धाव घेत तिला ताब्यात घेतलं".

"तिची आम्ही कसून चौकशी केली असता, तिने आपला गुन्हा कबूल केला. वडील आणि भावाला तिने का मारलं? याबाबत अल्पवयीन मुलीने जबाब दिला आहे. आता आम्ही तिला जबलपूर पोलिसांच्या स्वाधीन करणार असून मुलीच्या प्रियकराचाही शोध घेत आहोत".

भयंकर! १५ वर्षीय मुलीने वडिलांसह लहान भावाला संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन् फ्रीजमध्ये ठेवले
Jalgaon Crime: दुहेरी हत्याकांडाने भुसावळ शहर हादरलं! माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर फरार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com