Kalyan Railway Police : नशेसाठी कफ सिरपचा वापर; कल्याण रेल्वे पोलिसांनी केली दोघांना अटक

Kalyan News : कल्याण रेल्वे पोलीसांकडून सुरू असलेल्या तपासणी दरम्यान या दोघांच्या बॅगेत कफ सिरपच्या बाटल्या आढळून आल्या
Kalyan Railway Police
Kalyan Railway PoliceSaam tv
Published On

अभिजित देशमुख
कल्याण
: चेन्नई एक्सप्रेसने कर्नाटक कलबुर्गी येथून कल्याणला आलेल्या दोन जणांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २८० कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अटक आरोपीची नावे नवाब सिद्दीकी आणि अकील मटके अशी आहे. हे दोघेही भिवंडी येथील राहणारे आहेत. कफ सिरपचा वापर नशेसाठी केला जात असल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Kalyan Railway Police
Dhule Rasta Roko : अक्कलपाडा धरणातून लोंढाणा प्रकल्पात पाणी सोडा; ग्रामस्थांनी केला रास्ता रोको

कर्नाटक कलबुर्गी येथून चेन्नई एक्सप्रेसने नवाब सिद्दीकी आणि अकील मटके हे दोन जण कल्याण रेल्वे स्थानकावर उतरले. कल्याण रेल्वे पोलीसांकडून (Railway Police) सुरू असलेल्या तपासणी दरम्यान या दोघांच्या बॅगेत कफ सिरपच्या बाटल्या आढळून आल्या. (Kalyan) कल्याण रेल्वे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या दोघांकडे याबाबत विचारपूस केली. मात्र दोघांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. 

Kalyan Railway Police
Jalgaon News : शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू; खड्ड्यात उतरलेल्या म्हशी काढण्यासाठी गेले असताना घडली घटना

कफ सिरपचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याने रेल्वे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी या दोघांजवडील कफ सिरपच्या २८० बाटल्या ताब्यात घेत या दोघांना अटक त्यांची चौकशी सुरू केली. हे दोघे मूळचे भिवंडीचे राहणारे असून या दोघांनी बाटल्या कुठून आणल्या व त्या कोणाला विकणार होते. याचा तपास आता रेल्वे पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com