Jalgaon News : शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू; खड्ड्यात उतरलेल्या म्हशी काढण्यासाठी गेले असताना घडली घटना

Jalgaon News : जळगाव तालुक्यातील कडगाव येथील संतोष यादव धनगर (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी संतोष धनगर हे दुपारी म्हशी चारण्यासाठी गेले होते.
Jalgaon News
Jalgaon News Saam tv
Published On

जळगाव : जळगाव तालुक्यातील कडगाव- जोगलखेडा रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सदरची घटना २७ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली.  

Jalgaon News
Mira Bhayander News : वरसावे खाडीत दाम्पत्याची उडी; पतीला वाचवण्यात यश, महिलेचा शोध सुरू

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील कडगाव येथील संतोष यादव धनगर (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी (Farmer) संतोष धनगर हे दुपारी म्हशी चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी घरी परत येत असताना जोगलखेडा ते कडगाव रस्त्यावरील पुलाचे काम करण्यासाठी केलेल्या खड्ड्यात त्यांच्या म्हशी गेल्या. म्हशी खड्ड्यातील गाळात फसल्याने त्यांना काढण्यासाठी संतोष धनगर हे खड्ड्यात उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. 

Jalgaon News
Dhule Rasta Roko : अक्कलपाडा धरणातून लोंढाणा प्रकल्पात पाणी सोडा; ग्रामस्थांनी केला रास्ता रोको

ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी संतोष धनगर यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. संबंधित ठेकेदाराने काम अपूर्ण ठेवल्यामुळे संताप व्यक्त केला. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा नातेवाईक व ग्रामस्थांनी पवित्रा घेतला होता. रात्री अकराला मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला. शेळगाव बॅरेजच्या बॅकवॉटरसाठी कडगाव ते जोगलखेडा रस्ता उंच करण्याचे काम ठेकेदाराला दिले आहे. स्त्यावर एका ठिकाणी मोठा खड्डा खोदला आहे. आठवड्याभरापासून संततधारेमुळे खड्डा पाण्याने भरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com