Pune Crime News: कोयता गँगचा धुडगूस कायमचा बंद?; कोयते पुरवणाऱ्यांचाच केला बंदोबस्त

रजगारा हा पुण्यातील अनेक तरुणांना कोयते पुरवत असलेलं निदर्शनास आलं आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

Pune Crime News: पुण्यात गेल्या महिन्यापासून कोयता गॅंगमुळे नागरिक दहशतीत जगत आहेत. कोयता गॅंगमधील काहींना पोलिसांनी तिन ते चार दिवसांपूर्वीच अटक केली. आता या प्रकरणात दहशत पसवण्यासाठी कोयता गॅंगला कोयते नेमकं कोण पुरवत होतं या विषयी माहिती मिळाली आहे. कोयते पुरवणाऱ्या दुकानदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Latest Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कोयता गॅंगला कोयते पुरवणाऱ्या दुकानदाराचे नाव हुसेन राजगारा असे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने ही कारवाई करत १०५ कोयते जप्त केले आहेत. पुण्यात दहशत पसरवण्यासाठी हाच दुकानदार तरुणांना कोयते पुरवण्याचे काम करत होता.

राजगाराचं दुकान रविवार पेठेतील बोहरी आळीमध्ये आहे. मध्य प्रदेशमधून तो हे कोयते मागवत होता. रजगारा हा पुण्यातील अनेक तरुणांना कोयते पुरवत असलेलं निदर्शनास आलं आहे. यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Pune Crime News
Pune News: पुण्यात ट्रकचा भीषण अपघात; दूध देणाऱ्या ८ म्हशी जागीच ठार

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात एका टोळक्याकडून हातात कोयते घेऊन दहशत पसरवण्याचा प्रकार सुरू आहे. गेल्या १ महिन्यात ८ ते १० ठिकाणी या घटना घडल्या आहेत. पुण्यातील बाजार परिसरात आणि सिंहगड महाविद्यालय परिसरात या गॅंगने दहशत पसरवली आहे. अचानक येऊन चारचाकी आणि दुचाकीच्या काचा फोडणे, रस्त्यावर असलेल्या दुकानदारांना आणि फेरीवाल्यांना त्रास देणे असे प्रकार सुरू होते.

Pune Crime News
Pune : पुणेकर थंडीने गारठले ; रस्त्यावर धुक्याचं साम्राज्य

pune पोलिसांनी या गॅंगमधील काहींना अटक केली तसेच बाजार परिसरात त्यांची धिंड काढाली होती. तसेच आता त्यांना कोयते पुरवणाऱ्यालाच पोलिसांनी बेड्या ठोकल्याने नागरिक थोडे चिंतामुक्त झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com