pune news Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : आमच्याआधी मटण का खाल्लं? न्यू इयर पार्टीत मित्राने मित्राच्या डोक्यात फावडा घातला

Pune Crime News :आमच्या आधी मटण का खाल्लं? असा सवाल करत मित्राने मित्राच्या डोक्यात फावडा घातल्याची खळजळजनक घटना घडली आहे. पुण्यातील या घटनेने निगेश नावाच तरुण जखमी झाल्याची माहिती आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका न्यू ईयर पार्टीत मटण खालल्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. या न्यू ईयर पार्टीत मित्राने मित्राच्या डोक्यात फावडा घालून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरासह मुंबई-पुण्यात तरुणांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत होता. पुण्यातही जागोजागी तरुण पार्टी करताना दिसत होते. पुण्यातही नव वर्षाच्या दिवशी मद्यविक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. अनेक हॉटेल आणि पार्टी क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यविक्री झाली. तर काहींनी घरातही पार्टी केली. अशाच एका पार्टीत भयंकर घटना घडली. एका पार्टीत मित्रानेच मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात निगेश नावाचा तरुण जखमी झाला.

मिळाळेल्या माहितीनुसार, पुण्यात न्यू इयर पार्टीत मटण खाण्यावरून २ मित्रांमध्ये वाद झाल्याची घटना घडली आहे. आमच्याआधी मटण का खाल्लं, असा सवाल करत मित्रानेच मित्राला मारहाण केल्याची घटना घडली आहे. निगेश म्हेत्रे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. निगेशच्या मित्राने त्याच्या डोक्यात थेट फावडा घातला आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. निगेश म्हेथे हा तरुण या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसाहर, म्हेत्रे आणि सोनवणे हे दोघे ही एकमेकांचे मित्र आहेत. दोघे खासगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. इतकंच नाही तर ते दोघे ही एकाच खोलीत वास्तव्यास आहेत. दोघे नवीन वर्षाच्या निमित्ताने पार्टी करत होते. या पार्टीत, म्हेत्रे तू आमच्या अगोदर मटण का खातोस, या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात सोनवणेने म्हेत्रे याला शिवीगाळ करत फावडयाचे दांडक्याने त्याच्या डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न; घरी बोलावून शेतकऱ्याचं सोडवलं उपोषण

SCROLL FOR NEXT