Nagpur Crime: धावत्या ट्रेनमध्ये हत्येचा थरार, मोबाईल चोरीच्या संशयावरून तरूणाची हत्या

Hyderabad New Delhi Dakshin Express: हैदराबादवरून दिल्लीला जाणाऱ्या दक्षिण एक्स्प्रेसमध्ये मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला.
Nagpur Crime: धावत्या ट्रेनमध्ये हत्येचा थरार, मोबाईल चोरीच्या संशयावरून तरूणाची हत्या
Hyderabad New Delhi Dakshin ExpressSaam Tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये धावत्या ट्रेनमध्ये तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद -नवी दिल्ली दक्षिण एक्स्प्रेसमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली आहे.एका तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. धावत्या ट्रेनमध्ये ही घटना घडली. त्यामुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मोबाईल चोरीचा कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Nagpur Crime: धावत्या ट्रेनमध्ये हत्येचा थरार, मोबाईल चोरीच्या संशयावरून तरूणाची हत्या
Mumbai Crime: शेजारच्यानं खेळण्याच्या बहाण्यानं घरी नेलं अन् केला लैगिंक अत्याचार, ३१ डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं?

मध्यरात्री साडेतीन वाजताचा सुमारास दिल्लीकडे जाणाऱ्या धावत्या ट्रेनमध्ये वाद झाला. या वादातून चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. दक्षिण एक्सप्रेसच्या जनरल बोगीमध्ये ही घटना घडली. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. नागपूर लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Nagpur Crime: धावत्या ट्रेनमध्ये हत्येचा थरार, मोबाईल चोरीच्या संशयावरून तरूणाची हत्या
Navi Mumbai Crime : नवी मुंबईत घरात आढळला मायलेकाचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ,VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com