Pune Latest Online Fraud News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Latest Crime News : Youtube व्हिडीओ लाईक केले अन् ५० लाख गमावून बसला, पुण्यातील तरुणासोबत नेमकं काय घडलं?

Pune Latest Online Fraud News : पुण्यातील शुलभ नांगर नावाच्या तरुणाची सायबर चोरट्यांची फसवणूक केली आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Youtube Like Fraud News :

रिकाम्या वेळेत युट्यूबवर वेळ घालवणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. मात्र युट्यूबवर तुम्हीही व्हिडीओ पाहत असाल आणि एखादा व्हिडीओ लाईक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. (Pune News)

डिजिटल युगात लोक स्मार्ट झाले आहेत. मात्र काही लोकांना असलेल्या अपुऱ्या माहितीचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेताना दिसतात. सायबर ठग वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन लोकांचा फसणूक करत असतात. असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये YouTube चे व्हिडीओ लाईक करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला ५० लाखांचा फटका बसला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यातील शुलभ नांगर नावाच्या तरुणाची सायबर चोरट्यांची फसवणूक केली आहे. यूट्युबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाला ५० लाख रुपयांना गंडा घातला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी शुलभ नांगर यांना मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी यूट्युबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी आकर्षक कमिशन मिळेल, असे सांगितले. त्यानुसार आरोपींनी नांगर याला सुरवातीला १३५० रुपये कमिशनही दिले.

त्यानंतर टेलिग्राम ॲपवर लिंक पाठवून कमिशनचे आमिष दाखवून व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी ४९ लाख ६८ हजार रुपये घेतले. त्यानंतर आपल्याला कुठलेच कमिशन मिळाले नाही आणि आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आम्ही लोकशाही संपू देणार नाही - रामलीला मैदानावरून राहूल गांधी

Nauvari Saree Draping: नऊवारी नेसायला जमत नाही? मग सुंदर मराठमोळ्या लूकसाठी 'या' सोप्या पद्धतीने नेसा नऊवारी

Green Tea Benefits : वजन कमी करण्यापासून ते आजारांशी दोन हात करेपर्यंत...; 'हे' 2 पदार्थ मिसळून ग्रीन टी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे

Male Birth Control Pill: आता पुरूषांसाठी देखील गर्भनिरोधक गोळी, कशी करते काम? वाचा सविस्तर...

Chemical Free Facewash For Pimple And Dark Spots: पिंपल्स आणि काळ्या डागांवर सोपा घरगुती उपाय, घरच्या घरी बनवा केमिकल फ्रि फेसवॉश!

SCROLL FOR NEXT