Pune Cyber Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: हॅलो मुंबई पोलिस दलातून बोलतो, आजोबांचा फोन खणखणला; एका झटक्यात २७ लाख उडाले

Cyber ​Tthieves Cheated Man Of 27 Lakhs: पुण्यामध्ये सायबर चोरट्यांनी वृद्ध व्यक्तीची २७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. ही फसवणूक फक्त एक दोन नाही तर तब्बल २० ते २५ लाखांपर्यंत असते. या सायबर चोरट्यांनी पुण्यातील आणखी एका आजोबांची फवसणूक केली आहे. मुंबई पोलिस दलातून बोलतोय सांगत आजोबांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यांनी आजोबांना तब्बल २७ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र सुरुच आहे. मुंबई पोलिस दलातून बोलत असल्याची बतावणी करत चोरट्यांनी सिंहगड रस्ता भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची २७ लाखांची फसवणूक केली. याबाबत या ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाच्या आधारकार्डचा वापर करून पिस्तूल आणि अमली पदार्थ खरेदी करण्यात आली असल्याची बतावणी सायबर चोरट्यांनी केली. टेलीकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथोरिटीतून बोलत असल्याचे चोरट्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणात चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगून तातडीने पैसे जमा करावे लागतील असेही सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले.

सायबर चोरट्यांनी वारंवार कारवाई होण्याची भीती दाखवत आजोबांकडून पैसे उकाळले. त्यांच्याकडून २७ लाख रुपये चोरट्यांनी बँक खात्यात जमा करून घेतले. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर सायबर चोरट्यांनी फोन बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाला मोठा धक्का बसला. त्यांनी थेट पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT