Pune News : बँकेच्या महिला व्यवस्थापकाने हात साफ केला, तब्बल ३ कोटींचं सोनं चोरलं; पुण्यातील धक्कादायक घटना

Bank Manager Stole Gold Worth Rs 3 Crore: पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेतील महिला व्यवस्थापकाने बँकेच्या लॉकरमधील सोनं लंपास केले आहे. याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune News : बँकेच्या महिला व्यवस्थापकाने हात साफ केला, तब्बल ३ कोटींचं सोनं चोरलं; पुण्यातील धक्कादायक घटना
Bank Manager Stole Gold Worth Rs 3 CroreSaam Tv
Published On

नितीन पाटणकर, पुणे

पुण्यामध्ये बँकेच्या लॉकरमधील पावणे तीन कोटी रुपयांचे सोनं चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बँकेच्या महिला व्यवस्थापकानेच हे सोनं चोरलं. पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पंजाब नॅशनल बँकेच्या महिला व्यवस्थापकाने बँकेच्या लॉकरमधून तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचे सोने चोरलं. नयना अजवानी असे सोनं चोरलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या महिला व्यवस्थापकाचे नाव आहे. पुण्यातील सोपान बाग परिसरात राहणाऱ्या एका ४९ वर्षीय नागरिकांने कॅम्प परिसरात असलेल्या आरोरा टावर येथील पंजाब नॅशनल बँकेतील लॉकरमध्ये पावणेतीन कोटी रुपयांचे सोनं लॉकरमध्ये ठेवले होते.

Pune News : बँकेच्या महिला व्यवस्थापकाने हात साफ केला, तब्बल ३ कोटींचं सोनं चोरलं; पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Accident : कल्याणीनगरमध्ये पुन्हा दोघांना उडवले, एकाचा मृत्यू, चालक फरार

बँकेची महिला व्यवस्थापक नयना अजवानीने बँकेच्या लॉकरमधील सोनं चोरले. हे सोनं नयना अजवानी, सुरेंद्र शहानी यांनी चोरून ज्वेलर्स सतीश पंजाबी यांच्या दुकानात वितळवले. या चोरी प्रकरणी पुण्याच्या लष्कर पोलिस ठाण्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापिका नयना अजवानी, सुरेंद्र शहाणी आणि ज्वेलर सतीश पंजाबी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Pune News : बँकेच्या महिला व्यवस्थापकाने हात साफ केला, तब्बल ३ कोटींचं सोनं चोरलं; पुण्यातील धक्कादायक घटना
Pune-Bangalore Highway : पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी सुटणार, नितीन गडकरींचा मोठा निर्णय, नेमका प्लॅन काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com