PUNE CRIME NEWS: BOYFRIEND ATTACKS GIRLFRIEND WITH BLADE IN CHANDAN NAGAR Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून गर्लफ्रेंडचा गळा चिरला, बॉयफ्रेंडने घरात घुसून केले सपासप वार

Pune Crime News : पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमसंबंधातील वादातून प्रियकराने तरुणीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

  • आरोपी प्रियकराने घरात घुसून ब्लेडने गळ्यावर वार केला

  • गंभीर जखमी तरुणीवर खासगी रुग्णालयात ICU मध्ये उपचार

  • आरोपीला अटक केली

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमप्रकरणातून एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दिलीप राठोड (वय २२) याच्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप राठोड आणि समीक्षा (बदलेलं नाव) हे दोघेही पुण्यातील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. कामाच्या ठिकाणी दोघांमध्ये ओळख वाढली आणि त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत वाद सुरू होते. या वादातूनच आरोपीने संतापाच्या भरात हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेच्या दिवशी समीक्षा (बदलेलं नाव) घरी एकटीच होती. तिचा भाऊ आणि वहिनी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी दिलीप राठोड हा पठारेवस्ती परिसरातील तिच्या घरी आला. त्याने घरात घुसून ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत असतानाही तरुणीने धाडस दाखवत आपल्या भावाला फोन करून, "तु लवकर घरी ये मला एका मुलाने मारले आहे. खूप लागले आहे.माझ्या गळ्यातून आवाज येत नाही" असे सांगितले. त्यानंतर तिला बोलता येत नसल्याने तिने भावाला व्हिडीओ कॉलही केला. त्यावेळी ती रक्तबंबाळ अवस्थेत दिसत होती.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तरुणीला तिला कोणी मारले असे विचारले तेव्हा तिला बोलता येत नव्हते. तिने इशारा करून पेन आणि कागद मागितला. त्यावर तिने दिलीप राठोड असे लिहले. घरात घुसून तरुणीवर ब्लेडने वार करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी दिपील राठोडला चंदन नगर पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT