Pune Latest News saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुणे हादरलं! रिक्षाचालकाचा इंजिनिअर तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी ताब्यात

Pune Latest News: तरुणी रिक्षातून घरी येत असताना चालकाने निर्जन मार्गाने रिक्षा घेऊन गेला आणि रिक्षातच तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला.

Chandrakant Jagtap

Rape Attempt On Engineer Girl In Rickshaw: पुण्यात इंजिनिअर तरुणीवर रिक्षा चालकाने बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर परिसरात राहणारी २९ वर्षीय कॉम्प्युटर इंजिनिअर तरुणी कामावरुन रिक्षाने घरी येत असताना हा प्रकार घडला. ती रिक्षातून घरी येत असताना चालक निर्जन मार्गाने रिक्षा घेऊन गेला आणि रिक्षातच तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला.

या धक्कादायक प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अनिकेत नावाच्या २४ वर्षीय तरुणाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हा प्रकार २० जून रोजी सासवड रस्त्यापासून रेल्वे रुळाच्याबाजूने निर्जनस्थळी घडला. काळेपडळ रेल्वेगेट समोर आणि काळेपडळ रेल्वे पूल यादरम्यान रिक्षाचालकाने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. (Breaking News)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही खासगी आयटी कंपनीत कॉम्प्यूटर इंजिनिअर म्हणून नोकरी करते. कामावरुन घरी परतताना ती आरोपी अनिकेत याच्या रिक्षातून जात होती. रिक्षात बसल्यानंतर आरोपी रीक्षाचालकाने घरी जाण्याचा मार्गावरुन रिक्षा न घेता दुसऱ्याच निर्जन मार्गाने रिक्षा वळवली. (Marathi Tajya Batmya)

यानंतर रिक्षाचालकाने तरुणीला घेऊन अंधाराच्या ठिकाणी निर्जन ठिकाणी रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबवली आणि तरुणीच्या शरीराला स्पर्श करण्यास सुरुवात केली. यावेळी रिक्षाचालकाने तरुणीसोबत गैरकृत्य देखील करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वानवडी पोलीसांनी आरोपीविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSC SSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचे महत्त्वाचे पाऊल! दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच घेतला 'हा' निर्णय

Sanjay Dutt: संजय दत्तने मागितली महिला आयोगासमोर लेखी माफी; 'सरके चुनर' वादानंतर ५० मुलींच्या शिक्षणाचा उचलणार खर्च

Maharashtra News Live Update: खोपोली पेण रस्त्यावर हायवा डंपरला लागली आग

Summer diet tips: उन्हाळ्यात हे पदार्थ खाणं टाळाच, नाहीतर...!

Riteish Deshmukh - Raja Shivaji : सैराटमधील प्रसिद्ध अभिनेत्याने रितेश भाऊंसोबत फोटो केला शेअर, 'राजा शिवाजी' मध्ये 'या' महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार

SCROLL FOR NEXT