Sharad Pawar News: सत्ताधारी पक्ष जिथे कमकुवत तिथेच दंगली होतात; शरद पवारांचा गंभीर आरोप

Sharad Pawar Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे
Sharad Pawar Latest News
Sharad Pawar Latest NewsSaam TV
Published On

Sharad Pawar Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्र हे शांतता प्रिय राज्य असूनही सातत्याने दंगली होत आहेत. जिथे सत्ताधारी पक्षाची ताकद नाही, तिथे केले जाणीवपूर्वक दंगली निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar Latest News
Pm Modi America Visit: 'एक भविष्य, एक पृथ्वी, एक व्यक्ती', पंतप्रधान मोदींचा योग दिनी अमेरिकेत नारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद हाँल येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. देशात आज शेतकरी अस्वस्थ असून दुखावलेला आहे. कांदा, कापूस आणि सोयबीनसारख्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितलं होती की, आम्ही तीन वर्षात देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, पण आज ९ ते १० वर्ष होऊन गेली असं काहीच घडलं नाही. पण एका गोष्टीत डबल स्थिती बघायला मिळत आहे. ती म्हणजे शेतकरी आत्महत्या. महाराष्ट्रात गेल्या ५ महिन्यात ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतात याचा अर्थ आज राज्यात काय चित्र आहे, हे मी सांगणं गरजेचं नाही, असंही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar Latest News
Ajit Pawar News: हे असले धंदे करायला सत्तेत आलात का? अजित पवार मुख्यमंत्री शिंदेंवर भडकले

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण आज जाणीवपूर्वक समाजत जातीय दंगली घडवण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. गेल्या काही महिन्यांत कोल्हापूर, संगमनेर, नांदेड अकोला सारख्या जिल्ह्यांमध्ये जातीय दंगली झाल्या आहेत. महाराष्ट्रात शांतताप्रिय राज्य असून असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं, असं शरद पवार म्हणाले.

सत्ताधारी पक्षांची शक्ती जिथे नाही तिथे जातीय दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. राज्यात २३ जानेवारी २०२३ ते २३ मे २०२३ या कालावधीत ३ हजार १५२ मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यातून महिला तसेच मुली बेपत्ता होत असतील, तर राज्यकर्ते काय करत आहेत? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com