Pune Physical Abuse Case Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात काय चाललंय? ३२ वर्षीय महिलेचे अपहरण, जंगलात नेऊन अत्याचार

Pune Physical Abuse Case: पुण्यामध्ये महिलेचे अपरहण करून कर्जतच्या जंगलामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आलेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Priya More

नितीन पाटणकर, पुणे

पुण्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. पुण्यात महिला अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. ३२ वर्षीय महिलेचा अपहरण करून तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर कर्जतच्या जंगलात नेऊन या महिलेवर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी दोन जणांविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील महिलेवर कर्जतच्या जंगलात अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ३२ वर्षे महिलेचे अपहरण करून कर्जतच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला गेला. पीडित महिला पुण्यातील सहकारनगर भागामध्ये राहते. याप्रकरणी ३६ वर्षीय पुरुष आरोपी आणि ३२ वर्षे महिला आरोपी विरोधात सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला ही पुण्यातील सहकारनगर परिसरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. या महिलेला तिच्या ओळखीच्या ३६ वर्षीय आरोपीने त्याच्या कारमध्ये बसवत कर्जतच्या जंगलात नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पीडित महिलेला हाताने मारहाण करत दोन दिवस घरात डांबून ठेवले. कर्जत येथील जंगलात नेत तिच्यावर जबरदस्ती करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून अत्याचाराचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पुणे हादरले आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये वाडिया कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, शाळकरी मुलींवर स्कूलव्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार या घटना घडल्या असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र वारंवार पुण्यात दिसून येत आहे. बोपदेव घाटामध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

SCROLL FOR NEXT