Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime : शेजाऱ्यांनी शिव्या दिल्याच्या रागातून ११ वर्षीय मुलाने संपवलं जीवन; पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यातील लोहियानगर परिसरात सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे (Pune News) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील लोहियानगर परिसरात सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

रुद्राक्ष लुकेश जाधव (वय ११) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, रुद्राक्षचा घराशेजारी राहणाऱ्या माय-लेकींसोबत वाद (Crime News) झाला होता. यावेळी मायलेकींनी शिव्या दिल्याच्या रागातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती आहे.

याप्रकरणी रुद्राक्षची आई आशा लुकेशा जाधव (वय ३२, रा. लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Pune Police) फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मायलेकींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Latest News)

विद्या व साधना कांबळे असं गुन्हा दाखल केलेल्या मायलेकींची नावे आहेत. रुद्राक्षच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी आणि आरोपी या एकाच भागात राहतात. फिर्यादी यांचा मुलगा हा सहावीत शिकत होता.

गुरूवारी तो आरोपींच्या घरी गेला होता. यावेळी परत परत का येतो असं म्हणत घरात असलेल्या मायलेकींनी रुद्राक्षला शिवीगाळ केली. या रागातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

SCROLL FOR NEXT