Mumbai Railway News : मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. नेरळ रेल्वे स्थानकात मालवाहू गाडीच्या इंजिनात बिघाड झाला आहे. मागील अर्ध्या तासापासून कर्जत-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दुरुस्तीसाठी रेल्वेचे कर्मचारी नेरळ रेल्वे स्थानकात आल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील उपनगरीय ट्रेन विलंबाने धावत आहेत. त्याचा फटका ट्रेनने रोज प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला बसत आहे. उपनगरीय गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी आहे. यात आता आणखी भर पडली आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Maharashtra News)
मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकात सकाळी मालवाहू गाडीच्या इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे मालवाहू गाडी बराच वेळ नेरळ रेल्वे स्थानकात थांबली होती. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. कर्जतकडे आणि कर्जतहून मुंबईला येणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊन प्रवाशांचे हाल झाले. (Breaking Marathi News)
काही वेळाने रेल्वेचे कर्मचारी दुरुस्तीसाठी नेरळ स्थानकात पोहोचले. दुसरीकडे, मुंबईकडे जाणाऱ्या उपनगरी गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा बराच वेळ खोळंबा झाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.