Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुणे हादरले! ९ वर्षीय मुलीवर चुलत आजोबांकडून लैंगिक अत्याचार

Pune Police: पुण्यामध्ये ९ वर्षांच्या मुलीवर तिच्या चुलत आजोबाने लैंगिक अत्याचार केले. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी आजोबाला अटक केली असून तपास सुरू केला आहे.

Priya More
  • पुण्यामध्ये ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

  • चुलत आजोबाकडून भयंकर कृत्य

  • पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत केली अटक

  • या घटनेमुळे पुणे पुन्हा हादरले

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या चुलत आजोबांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात येवलेवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आजोबाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडीत कुटुंब हे मूळचे नेपाळचे असून कामानिमित्त पुण्यात राहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ७० वर्षीय वृद्धाने आपल्या ९ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केले. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने हे कृत्य केले. आरोपी पीडित मुलीचा चुलत नातेवाईक आहे. या प्रकरणी लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून घटनेमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर समाजात संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच शहरात एका वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची ही धक्कादायक घटना समोर आली आहे. याआधी देखील पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर तिच्या आजोबाने बलात्कार केला होता. या प्रकरणातील आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

Morning Routine: सकाळच्या या १० सवयी लावून घ्या, दिवसभर राहाल ताजेतवाने...

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण अपघात, भरधाव ट्रकची समोरून धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू

Glass Vs Plastic Tiffin Box: टिफिनसाठी प्लास्टिकचे की काचेचे कोणते डबे वापरावे?

Fashion Jewelry Tips: आर्टिफिशियल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चमक टिकवण्यासाठी ५ सोप्या टिप्स, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT