Pune Nana Peth Firing Saam
मुंबई/पुणे

'कृष्णा तुझा एन्काऊंटर करू' पोलिसांचा १ फोन अन् कृष्णाची तंतरली, २४ तासांच्या आत हजर

Pune Nana Peth Firing: तपास अधिकारी शैलेश संख्ये यांनी फोनवर "तुझा एन्काऊंटर करू" असे सांगितल्याने कृष्णा आंदेकर अवघ्या २४ तासांत समर्थ पोलिस ठाण्यात शरण गेला.

Bhagyashree Kamble

  • नाना पेठेत आयुष कोमकरवर १२ राऊंड फायरिंग करून हत्या.

  • बंडू आंदेकरासह १३ आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

  • फरार आरोपी कृष्णा आंदेकर पोलिस एन्काऊंटर भीतीने शरण.

  • गुन्हे शाखेकडे ताबा, आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार.

पुण्यात गणेश चतुर्दशीच्या एक दिवस आधी नाना पेठ येथे आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी १३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, बंडू आंदेकराचा मुलगा कृष्णा आंदेकर बेपत्ता होता. आज तो समर्थ पोलिसांसमोर शरण गेला आहे. मात्र, शरण जाण्यामागे एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तपास अधिकारी शैलेश संख्ये यांनी त्याला फोन करून एन्काऊंटर करू असं म्हटलं होतं. त्यानंतर फरार आरोपी कृष्णा आंदेकर स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला.

५ सप्टेंबरला नाना पेठेत आयुष कोमकर याची हत्या कऱण्यात आली. आयुषवर १२ राऊंड फायर करून त्याला संपवलं. आयुष्यच्या बॉडीमध्ये नऊ गोळ्या सापडल्या. त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आयुषच्या हत्या प्रकरणात कुख्यात गुंड आणि आयुषचे सख्खे आजोबा बंडु आंदेकरांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत बंडु आंदेकरांसह १३ जणांना ताब्यात घेतलं आहे.

मात्र, मुख्य कृष्णा आंदेकर फरार होता. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातीलस तपास अधिकारी शैलेश संख्ये यांनी कृष्णाला फोन केला. तसेच तुझा एन्काऊंटर करू,असे सांगितले. यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच कृष्णा आंदेकर समर्थ पोलिसांसमोर शरण गेला.

दरम्यान, कृष्णा अंदेकरची वैद्यकीय तपासणी करून त्याचा ताबा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. कृष्णा अंदेकरला पोलीस आज दुपारी कोर्टात हजर करणार आहेत. या हत्या प्रकरणातील आरोपींना १८ सप्टेंबर पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : "अजित दादा खूप आठवण येत राहील..."; मराठमोळ्या अभिनेत्याची काळीज चिरणारी पोस्ट

Health Care : कांद्याची पात खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक मैदानात ठेवणार

आवाज भयंकर येत होता म्हणून...अजित पवारांच्या विमानाचा शेवटचा व्हिडिओ ११ वर्षांच्या मुलीनं मोबाइलमध्ये केला कैद

Ajit Pawar Death: पायलटचा ट्रॉफिक कंट्रोलला कॉल अन्...; अजित पवारांच्या विमान अपघातापूर्वी काय झालं?

SCROLL FOR NEXT