
देहरादूनमधील सहस्त्रधारा परिसरात सोमवारी रात्री ढगफुटी झाली.
आसन नदीला पूर आल्याने ८ कामगार बेपत्ता झाले, अनेक दुकाने वाहून गेली.
मुसळधार पावसामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.
SDRF आणि NDRF पथकं घटनास्थळी दाखल होऊन मदत व बचावकार्य करत आहेत.
उत्तराखंडच्या देहरादूनमधून निसर्गाचं रौद्ररूप पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून देहरादूनमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारी रात्री देहरादूनमध्ये ढगफूटी झाली. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सोमवारी रात्री उशिरा सहस्त्रधारा येथे ढगफुटी झाल्याची माहिती आहे. यात अनेक दुकाने आणि वाहने वाहून गेली. तर, अनेक लोक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. तसेच जनावरंही वाहून गेल्याची माहिती आहे. ढगफुटीचा भयंकर व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
झाझराजवळील परवल गावात आसन नदीला पूर आला. नदीच्या जोरदार प्रवाहात आठ कामगार बेपत्ता झाल्याची माहिती आहे. या पाण्यात एक ट्रॅक्टर आणि एक स्कूटरही वाहून गेली. नंदा की चौकीच्या पुलाचेही पाण्याच्या प्रवाहामुळे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थिती लक्षात घेता, देहरादून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर केली आहे. एसडीआरएफ आणि मदत पथकांना तैनात ठेवण्यात आले आहे. सध्या बचावकार्य आणि बेपत्ता लोकांचा तपास सुरू आहे.
स्थानिकांच्या मते, ढगफुटी झाल्यानंतर जोरदार पाऊस झाला. जोरदार प्रवाहासोबत आलेल्या चिखलाखाली ७ ते ८ दुकाने पूर्णपणे वाहून गेली. तर, जवळील भागाचेही प्रचंड नुकसान झाले. तर, काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. ढगफुटीबाबत माहिती मिळताच रात्री एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाले.
बाधित भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. मदत आणि बचाव कार्यासाठी अनेक अवजड वाहने तैनात करण्यात आली आहेत. बेपत्ता लोकांचा शोध युद्धपातळणीवर सुरू आहे. गावप्रमुख राकेश जावडी म्हणाले की, 'कार्लिगडमध्ये ढगफुटी झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात ढिगारा पडला. यामुळे अनेक दुकाने आणि हॉटेल्स कोसळली. सध्या प्रशासनाने लोकांना प्रभावित भागांत खबरदारी घेण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केलंय'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.