Pune Crime x
मुंबई/पुणे

Pune Firing : पुण्यात गोळीबाराचा थरार! क्षुल्लक कारणावरुन फायरिंग, निलेश घायवाळ टोळीतील चौघांना अटक

Pune News : पुण्यामध्ये मध्यरात्री गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. गुंड निलेश घायवाळ याच्या टोळीकडून गोळीबार झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

Yash Shirke

  • पुण्यात कोथरूडमध्ये निलेश घायवळ टोळीने मध्यरात्री गोळीबार केला.

  • शुल्लक कारणावरून झालेल्या फायरिंगमध्ये प्रकाश धुमाळ जखमी झाला.

  • पोलिसांनी टोळीतील चार जणांना अटक करून इतरांचा शोध सुरु केला आहे.

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Crime News : पुण्यामध्ये पुन्हा एकदा गोळीबारीची घटना झाल्याचे उघडकीस आले आहे. मध्यरात्री पुण्यातील कोथरूडमध्ये गुंड निलेश घायवाळ टोळीतील ५ जणांनी गोळीबार केला. एका व्यक्तीवर किरकोळ कारणावरुन गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांनी गोळीबार प्रकरणात चार जणांना अटक केली आहे.

पुण्यातील गोळीबारामुळे शहर पुन्हा हादरले आहे. पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनपासून जवळच गोळीबार झाला. प्रकाश धुमाळ ही ३६ वर्षीय व्यक्ती रात्री मुठेश्वर मंदिरासमोर उभी होती. यादरम्यान दुचाकीला रस्ता दिला नाही या शुल्लकर कारणामुळे निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार सुरु केला. यात प्रकाश धुमाळला ३ गोळ्या लागल्या.

गोळीबार सुरु झाल्यानंतर प्रकाश एका इमारतीच्या दिशेने धावला. पाण्याच्या टाकीवर चढून लपून बसला. यादरम्यान तेथे राहणाऱ्या सचिन गोपाळघरे नावाच्या व्यक्तीने प्रकाश धुमाळला पाणी दिले आणि मदत केली. यानंतर अर्धा तासांनंतर पोलीस घरी आले. इमारतीपासून गोळीबार झालेले ठिकाण २०० मीटर अंतरावर होते.

गोळीबार प्रकरणात पोलिसांनी निलेश घायवळ टोळीतील चार जणांना अटक केली आहे. टोळीतील मयुर कुंभारने हा गोळीबार केला. मयुर कुंभारसह मुसा शेख, रोहित अखाड, गणेश राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे इतर साथीदार फरार झाले आहेत. फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे. पुण्यात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Alert : महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी! परभणीत तापमान ६ अंशावर; इतर जिल्ह्यात हवामान कसं?

DA Hike: ३% की ५%, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ? वाचा सविस्तर

Til Barfi Recipe : मकर संक्रांतील पाहुण्यांसाठी खास बनवा तिळाची मऊसूत बर्फी, वाचा सिंपल रेसिपी

Maharashtra Live News Update: राज्यातील सर्वाधिक थंडी पूर्ण शहरात, पारा ९.५ अंशावर

Priyanka Chopra Photos : डोळ्यात आग अन् रक्ताने माखलेले शरीर; 'द ब्लफ'मधील प्रियंका चोप्राचा खतरनाक लूक समोर, रिलीज डेट काय?

SCROLL FOR NEXT