Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, पुण्यातील भाजप नेत्याविरोधात गुन्हा

Pune Police: पुणे महानगर पालिकेत काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने भाजप नेत्याविरोधात विनयभंग केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत या नेत्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Priya More

पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगाची घटना घडली होती. या प्रकरणी आता भाजपच्या नेत्याविरोधात कारवाई करण्यात आली. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या महिला अधिकाऱ्याने ओंकार कदमविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत आता पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई करत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला त्रास दिल्याच्या आरोपाखाली भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली होती. याबाबत समिती स्थापन करत चौकशी करण्याचे आदेश महिला आयोगाने दिले होते. या प्रकरणानंतर ओंकार कदम यांनाा पुणे महानगरपालिकेत बंदी देखील घालण्यात आली होती. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पोलिसांनी महिला अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला. ज्यामध्ये या महिला अधिकाऱ्याने आरोप केला आहे की, 'ओंकार कदम त्यांच्या कार्यालयात वारंवार येत असे, त्यांना शिवीगाळ करत असे आणि त्यांच्या संमतीशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करत असे.' या प्रकरणी महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली ओंकार कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कलम ७८, कलम ७९, कलम १२६, कलम १८९(२) आणि कलम ३५१(२) याअंतर्गत त्यांच्याविरोधात कारवाई केली.

महिला अधिकाऱ्याच्या आरोपांमुळे आता ओंकार कदम अडचणीत आले आहेत. या घटनेमुळे पुणे महानगर पालिकेमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आधी कारवाई का केली नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. पुणे महानगर पालिका प्रशासनाने यापूर्वीच ओंकार कदम यांना पालिकेच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई केली होती. परंतु पोलिस कारवाईच्या अभावामुळे त्यांचे याठिकाणी सतत येणं जाणं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss: पोटावरची चरबी वाढत चाललीये? सकाळी १ ग्लास प्या हे ड्रिंक, आठवड्यातच जाणवेल फरक

Political News : खासदार होताच आमदारकीचा राजीनामा दिला, मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार?

Maharashtra Live News Update: कणकवली-नरडवे रोडवर कारला आग लागून कार जळून खाक

आमदारकी अन् मंत्रिपदासाठी खरातच्या दरबारी खेट्या, 8 वर्षांपासून संपर्क; चाकणकरांनंतर शिवसेनेच्या महिला नेत्या अडचणीत

Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्टवरुन ३० नवीन शहरांसाठी फ्लाइट; नवीन वेळापत्रक जारी

SCROLL FOR NEXT