Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: धक्कादायक! उलटी केल्यामुळे गर्लफ्रेंडच्या मुलासोबत केलं भयंकर कृत्य, बॉयफ्रेंडला अटक

Boyfriend Killed Girlfriend Boy: गर्लफ्रेंडच्या मुलाने उलटी केल्यामुळे बॉयफ्रेंड संतापला. बेदम मारहाण केल्यामुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Priya More

सचिन जाधव, पुणे

उलटी केल्याने गर्लफ्रेंडच्या चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बॉयफ्रेंडने केलेल्या बेदम मारहाणीमध्ये गर्लफ्रेंडच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी बॉयफ्रेंडला बेड्या ठोकल्या आहेत. चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश कुंभार असं आरोपीचे नाव आहे. तर वेदांश काळे असं मृत्यू झालेल्या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. गर्लफ्रेंडच्या चार वर्षांच्या मुलाने उलटी केल्यामुळे महेश प्रचंड संतापला. त्याने या चिमुकल्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये मुलाचा मृत्यू झाला. आरोपी महेशने ४ वर्षाचा वेदांश खाटेवरून खाली पडल्याने बेशुद्ध पडल्याचा बनाव केला. त्यामुळे वेदांतच्या आईने मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयात त्याला उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान वेदांशचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन अहवालात वेदांतचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे असमोर आले. त्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात चार वर्षांच्या चिमुकल्याची आई पल्लवी तीन महिन्यांपासून बिबवेवाडी परिसरात राहत होती. तिचे नाशिकच्या महेश कुंभारशी प्रेमसंबंध होते. १ सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर वेदांशने अचानक उलटी केल्याने महेश चिडला. त्याने त्याला हाताने आणि झाडूने बेदम मारहाण केली.

महेशने केलेल्या मारहाणीमध्ये वेदांश बेशुद्ध पडला. त्यानंतर महेशने आपल्या गर्लफ्रेंडला वेदांश खाटेवरुन खाली पडल्याचे सांगितले. त्यानंतर वेदांशला नाशिकमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला उपचारासाठी पुण्यात आणण्यात आले. पुण्यातील मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. वेदांशची प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी महेश कुभांरला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav and Raj Thackeray Together Again: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, कधी अन् कुठे? पाहा व्हिडिओ

Marathi Producer Death: साताऱ्याचे ज्येष्ठ साहित्यिक आणि निर्माते काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Rava Kheer Recipe : सणासुदीला पाहुण्यांसाठी झटपट बनवा रव्याची खीर, वाचा कोकण स्टाइल रेसिपी

क्षणात होत्याचं नव्हतं! ५७ प्रवाशांनी भरलेली धावती बस आगीच्या भक्ष्यस्थानी; १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

Arthritis joint care tips: संधिवाताबद्दल जाणून घ्या 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी; सांध्यांची काळजी घेणं गरजेचं

SCROLL FOR NEXT