Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात 'कोयता गँग'नंतर आणखी एका टोळीचा धुमाकूळ; शहरातील 10 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, नागरिकांमध्ये दहशत

Pune Crime News : पुण्यात 'कोयता गँग'नंतर आणखी एका टोळीचा धुमाकूळ घातलाय. या टोळीने शहरातील 10 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : पुण्यात 'कोयता गँग'नंतर आणखी एका टोळीने एन्ट्री मारली आहे. पुण्यातील नव्या टोळीने धूमाकूळ घातला आहे. पुण्यात घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या टोळीमुळे नागरिक दहशतीत आहेत. पुण्यातील नव्या टोळीने शहरातील विविध भागात घरफोड्या केल्या आहेत. याच टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

पुण्यात घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या या 'बारक्या टोळी'च्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. पोलिसांनी पुणे शहरातील जवळपास सहा वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह चार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी बारक्या टोळीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांकडून १० लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तर दोन लाख ४० हजार रुपयांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी 'बारक्या टोळी'च्या पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आव्हाड, आनंद लोंढे, आर्यन आगलाव, कुलदीप सोनवणे आणि एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

उल्हासनगरमध्ये रिक्षा चालकावर चॉपरने हल्ला

उल्हासनगरच्या आशेळे पाडा भागात शनिवारी सायंकाळी रिक्षा चालकावर टोळक्याने चॉपरने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. रिक्षा चालकावरील चॉपरचा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी चॉपर हल्ला प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: टॅनिंग कमी करुन 3 दिवसात मिळवा ग्लोईंग फेस, वापरा 'हा' होममेड स्पेशल फेस मास्क

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

Lockdown News : इराण युद्धामुळे भारतात लॉकडाऊन लागणार? व्हॉट्सॲपवरील 'तो' मेसेज किती खरा? वाचा

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी

Ashok Kharat Case: मासा पाण्यातील वनस्पती! शाकाहारी लोकांना खायायला लावले मासे, खरातचा बंडलपणा आला समोर

SCROLL FOR NEXT