Nashik News : सिनेस्टाईल अपहरण प्रकरणी मोठी अपडेट; नवऱ्याने बायकोसोबत भयकंर कृत्य का केलं? धक्कादायक माहिती आली समोर

husband kidnap wife : सिनेस्टाईल अपहरण प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. नवरा-बायकोमध्ये नेमकं कशावरून बिनसलं, याची माहिती समोर आली आहे.
nashik crime
husband kidnap wife Saam tv
Published On

तबरेज शेख, साम टीव्ही

नाशिकमध्ये भांडण झाल्यानतंर पत्नी माहेरी निघून आल्यानंतर पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने पत्नीचं अपहरण केल्याचं समोर आलं आहे. सिन्नर तालुक्यातील वावी गावाच्या शिर्डी रोडवर ही घटना घडली. या प्रकरणी पतीसह मित्रांवर वावी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पत्नीने सासूला मारहाण करून पत्नीचं अपहरण केलं.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी गावात आईसोबत रस्त्याने पायी जाणारी तरुणीचं अपहरण झाल्याची घटना घडली होती. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हा संपूर्ण प्रकार मीडिया आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे तरुणीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सिन्नर तालुक्यात एका तरुणीचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. या बाबत वावी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासात धक्कादायक माहिती सामोर आली. पत्नी नांदायला येत नाही म्हणून तिच्या पतीने मित्रांसोबत अपहरण केल्याची माहिती मिळाली. काही दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या तरुणीने वैभव पवार या मुलासोबत प्रेम विवाह केला. मात्र काही दिवसानंतर दोघांचे भांडण झाले.

तरुणी आईच्या घरी निघून आली. मुलीला पुन्हा नवऱ्याकडे जाण्यास आईने विरोध केला. त्याचाच राग मनात धरून जावयानेच मित्रांच्या मादतीने स्वतःच्या पत्नीचं अपहरण करून बळजबरी कारमध्ये बसवलं. शिर्डीला घेऊन गेला. मात्र पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवत संशयित पतीला ताब्यात घेतले. तर आता पोलीस फरार असलेल्या त्याच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहे.

अपहरणानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत अपहत पत्नीची शिर्डी बस स्थानक परिसरातून सुटका केली. त्यानंतर पतीला अटक करून कोर्टात हजर केलं. कोर्टाने 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तर वैभव पवारच्या मित्रांचा शोध पोलीस घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com