
अभिजित सोनावणे, साम टीव्ही
एका मद्यपी व्यक्तीने स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. "हॅपी होली" मद्यपीने कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतले. तसेच आगही लावली. यात कर्मचारी ६० टक्के भाजला गेला आहे. ही धक्कादायक घटना नाशिकच्या ठक्कर बाजार परिसरात घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मद्यपी व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र, बस स्थानकात सीसीटीव्ही ऑपरेटर नसल्यामुळे तपासाला अडथळ येत आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू आहे.
आरोपीचे नाव शुभम जगताप असे आहे. तर, आगीत होरपळलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याचे नाव विजय गेहलोत असे आहे. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात विजय सफाईचे काम करत होता. या दरम्यान, आरोपी शुभम त्या ठिकाणी आला. त्याने मद्यपीला हटकले. या ठिकाणी पुन्हा येऊ नकोस असं स्वच्छता कर्मचारी मद्यपी व्यक्तीला म्हणाला.
या नंतर शुभमला राग आला. रागाच्या भरात त्याने विजयच्या अंगावर पेट्रोल ओतले. तसेच विजयला "हॅपी होली" म्हणून शुभेच्छा दिल्या आणि आग लावली. या आगीत विजय होरपळला. तेथील काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. या आगीत विजय ६० टक्के भाजला गेल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरूवात केली. बस स्थानकातील सीसीटीव्ही ऑपरेटर बिघडल्यामुळे पोलिसांना तपास घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.