Pune Crime  Saam tv
मुंबई/पुणे

Pune: ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मावळमध्ये संतापाची लाट; आरोपीला फाशी द्या, गावात कडकडीत बंद

Pune Crime: पुण्यामध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. मावळच्या उर्से गावातही घटना घडली होती. या प्रकरणी संतप्त होत गावकऱ्यांनी गावात कडकडीत बंद ठेवत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

Priya More

Summary:

  • पुण्यातील मावळमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या

  • मावळच्या उर्से गावात ही घटना घडली

  • आरोपीला पोलिसांनी अटक केली

  • घटनेच्या निषेधार्थ गावकरी आक्रमक

दिलीप कांबळे, मावळ

पुणे जिल्ह्यातल्या मावळमधील उर्से गावात ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे पुणे जिल्हा हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उर्से गावातील नागरिकांच्या वतीने कडकडीत बंद पाळून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. तर सकल मराठा महासंघाच्या वतीने वडगावमध्ये निषेध करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळच्या उर्से गावामध्ये ५ वर्षांच्या मुलीवर ३० वर्षीय तरुणाने बलात्कार केला. आरोपीने बलात्कारानंतर चिमुकलीची हत्या केली आणि मृतदेह झुडपामध्ये फेकून दिला. या मुलीचे आई-वडील खेळणी तयार करणाऱ्या कंपनीत काम करतात. ते आपल्या दोन्ही मुलांना घरीच सोडून जायचे. नेहमीप्रमाणे ते शनिवारी सकाळी कामाला केले. घरी आल्यानंतर त्यांना मुलगी दिसली नाही त्यामुळे त्यांनी शोध घेतला. पण ती सापडली नाही.

बराच वेळ शोध घेतल्यानंतर चिमुकलीचा मृतदेह रविवारी शेतात आढळून आला. पोलिस तपासात मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा तपास करताना मावळे पोलिसांनी अवघ्या काही तासांच ३० वर्षीय तरुणाला अटक केली. समीर कुमार मंडल असं आरोपीचे नाव असून तो मुलीच्या घराच्या शेजारी राहतो. या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.

कान्हे फाटा येथे गेल्या आठवड्यात अशीच घटना घडली होती. तर २ वर्षापूर्वी कोठूरने येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनांनंतर मावळमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ उर्से गावातील नागरिकांकडून दुकाने, आस्थापना पूर्णतः बंद ठेवण्यात आली. ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगर मध्ये भाजपकडून जल्लोष

Vati Mangalsutra Designs: पारंपारिक सौंदर्याचा तोरा, वाटी मंंगळसूत्राच्या या 5 लेटेस्ट डिझाईन्स पाहून तुम्ही पडाल प्रेमात

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : उमेश पाटलांच्या पराभवानंतर भाजपकडून जल्लोष

राज ठाकरेंचा भाजप-काँग्रेसला दणका; एकही सभा न घेता जिल्हा परिषदेत इंजिन धावलं

Raigad Zilla Parishad Election Result: रायगडमध्ये अजित पवार गटाची हवा; भाजप तिसऱ्या नंबरवर, शेकापच्या हाती भोपळा, वाचा संपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT