Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Crime News : तुझी शेवटची इच्छा काय? सिगारेट अन् दारू पाजली, नंतर धारदार शस्त्राने वार करत मित्राला संपवलं; हत्याकांडाने पुणे हादरले

Pune Crime News : पुण्यातील विश्रांतवाडी भागातून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय तरुणाचे अपहरण करून ब्लेड, चाकू आणि कोयत्याने वार करत दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • १७ वर्षीय तरुणाचे अपहरण करून खेड शिवापूर डोंगरात हत्या

  • ब्लेड-चाकू-कोयत्याने वार, दगडाने डोके ठेचले

  • ११ आरोपींवर गुन्हा दाखल

  • पूर्वीच्या वादातून बदला हत्या केल्याचे उघड

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील विश्रांतवाडी भागातून हरवलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून चाकूने गळा चिरून दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड (वय १७, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याचे मित्र प्रथमेश चिंधू आढळ आणि नागेश बालाजी धबाले यांनी त्याची हत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या या गुन्ह्यात इतर ९ जणांनी साथ दिली आहे. त्यामध्ये एका मुलीचा देखील समावेश आहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागातून अमनसिंग हा गायब झाला होता. बुधवारी ७ जानेवारी रोजी रात्री या तरुणाचा मृतदेह खेड शिवापूर परिसरात सापडला.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये अमनसिंग आणि प्रथमेश यांच्यात वाद झाले होते. त्या दोघांमध्ये झालेल्या झटापटीत प्रथमेशच्या हाताला गंभीर जखम झाली होती. त्यामुळे तो त्याच्यावर चिडून होता. हा प्रकार घडल्यानंतर अमनसिंग विश्रांतवाडी परिसरात राहण्यास आला होता. परंतु, तो कोठे राहतो, हे प्रथमेशला माहिती नव्हते. त्यासाठी त्याने मैत्रिणीची मदत घेतली. तिला आरोपींनी सांगितले की, आम्ही अमनसिंगला फक्त धमकावणार आहोत. त्यामुळे तू आमच्यासाठी इन्स्टाग्रामवर त्याच्यासोबत मैत्री कर. अमनसिंग अलगद प्रथमेशने लावलेल्या सापळ्यात अडकला.

खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिराच्या डोंगराळ परिसरात २९ डिसेंबरच्या दिवशी मैत्रिणीच्या सांगण्यावरून अमनसिंग तिने सांगितलेल्या ठिकाणी भेटायला आला. दोघांनी मंदिरात दर्शन घेतलं. तेवढ्यात धबाले तेथे आला. तो अमनसिंगला डोंगरात घेऊन गेला. तेथे अगोदरच प्रथमेश आढळ आणि त्याचे इतर मित्र आलेले होते.

प्रथमेश आणि त्याच्या साथीदारांनी अमनसिंगला शेवटची इच्छा काय? असे विचारले असता त्या वेळी त्याने बिअर आणि सिगारेट मागितली. आरोपींनी त्याला बिअर, सिगारेट आणून त्याला दिली. त्यांनी अमनसिंगला स्वतःचा खड्डा खणायला लावला. त्याला खड्ड्यात पुरून टाकले. मात्र तो कदाचित बाहेर पडेल या भीतीने त्यांनी अमनसिंगला त्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी अमनसिंगच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. परंतु, वार खोलवर गेला नसल्याचे आरोपींच्या लक्षात आले. यानंतर त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करून, डोके दगडाने ठेचले.अमनसिंग मेल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह त्याच खड्यात पुरून टाकून पळ काढला.

अमनसिंग घरी न आल्याने त्याच्या आईने तक्रार केली. आईच्या तक्रारीवरून गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने समांतर तपास करीत असताना बेळगाव, कर्नाटक येथून मुख्य सूत्रधार प्रथमेश आढळ आणि त्याचा साथीदार या दोघांना आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.चौकशीत प्रथमेशने पूर्वीच्या वादातून अमनसिंगचा साथीदारांच्या मदतीने खून करून मृतदेह खेड शिवापूरच्या डोंगरात पुरल्याची कबुली दिली. दरम्यान, बुधवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमनसिंग याचा मृतदेह पोलिसांनी खेड शिवापूर परिसरातील डोंगरातून शोधून काढला, मृतदेहाची अवस्था बिकट झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT