Pune Court  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: जिल्हा न्यायालयात तरुणाची आत्महत्या, चौथ्या मजल्यावरून मारली उडी; पुण्यात खळबळ

Pune District Court: पुण्यातील जिल्हा न्यायालयात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने उडी मारत आयुष्य संपवले. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

Summary -

  • पुणे जिल्हा न्यायालयात तरुणाने आत्महत्या केली

  • इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाची उडी मारत आयुष्य संपवलं

  • न्याय मिळत नसल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल

  • शिवाजीनगर पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील जिल्हा न्यायालयामध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा न्यायालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून या तरुणाने उडी मारत आयुष्य संपवलं. न्यायालयात आज सुनावणी होती. न्याय मिळत नसल्यामुळे या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीवरून उडी मारून एका पक्षकाराने आत्महत्या केली. केस चालत नाही, न्याय मिळत नाही यामुळे संतप्त झालेल्या पक्षकाराने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाजीनगर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. शिवाजीनगर पोलिस सध्या तपास करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, नामदेव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नामदेव हे पुण्यातील वडकी भागातील राहणारे होते. जमिनीच्या व्यवहारातून झालेल्या वादाच्या संदर्भात त्यांची केस पुणे न्यायालयात सुरू होती. गेल्या २७ वर्षांपासून त्यांची केस पुणे न्यायालयात सुरू होती. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या केसमध्ये न्याय मिळत नसल्याचा कारणातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talathi Bharti: तलाठी भरतीत महसूल सेवकांना प्राधान्य, अनुभवानुसार काही जागा राखीव; राज्य सरकारचा निर्णय

किन्नरांच्या दोन गटात वाद, 1,500,000,000 रुपयांची संपत्ती; इंदूरच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण

रस्त्यावरची दहशत कमी करण्यासाठी पुण्यात भटक्या कुत्र्यांना ट्रॅक करण्याचा नवा मार्ग

Diwali Pahat: दिवाळी पहाटचा कार्यक्रम पाहायचाय? तर मुंबईतील 'या' ५ ठिकाणांना नक्की भेट द्या

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे प्रसूती यशस्वीरित्या पार पाडणारा रिअल हिरो

SCROLL FOR NEXT