Pune Crime : पार्टीत दारू पिऊन कॉन्स्टेबल तर्राट! नशेत गाडी चालवत ६ वाहनांना धडक, पोलीस अटकेत

Pune News : पुण्यात दारूच्या नशेत गाडी चालवत पोलीस कॉन्स्टेबलने ५ ते ६ वाहनांना धडक दिली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलला अखेर अटक करण्यात आली आहे. इनामे यांना निलंबित करण्यात येणार आहे.
Pune Crime : पार्टीत दारू पिऊन कॉन्स्टेबल तर्राट! नशेत गाडी चालवत ६ वाहनांना धडक, पोलीस अटकेत
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • दारूच्या नशेत गाडी चालवत पोलीस कॉन्स्टेबलने सहा गाड्यांना धडक दिली

  • नागरिकांच्या दबावानंतर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

  • आरोपी कॉन्स्टेबलची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करण्यात आला

  • हेमंत इनामे असं या कॉन्स्टेबलचं नाव आहे

पुण्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. दारूच्या नशेत गाडी चालवत एका पोलीस कॉन्स्टेबलने अनेक जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे. धक्कदायक म्हणजे याबाबत पुणे पोलिसांनी या पोलीस कॉन्स्टेबलवरती कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र अखेर आज पुणे ग्रामीण पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्हच्या आरोपाखाली पोलीस कॉन्स्टेबलला अटक केली आहे. या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव हेमंत इनामे आहे.

पुण्यातील रांजणगाव एम आय डी सी मधे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे रविवारी रात्री एका पार्टीत दारू पिऊन आले होते. या दारूच्या नशेत इनामे पुणे - नगर रस्त्यावरून जात होते. या दरम्यान त्यांनी सहा गाड्यांना धडक दिली. या धडकेत अनेकजण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी दाखल असलेल्या नागरिकांनी या नशेत असलेल्या कॉन्स्टेबल विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Pune Crime : पार्टीत दारू पिऊन कॉन्स्टेबल तर्राट! नशेत गाडी चालवत ६ वाहनांना धडक, पोलीस अटकेत
Crime News : खोटं कारण देऊन निर्जनस्थळी नेलं, १३ वर्षीय मुलीवर भावाने केले अत्याचार, २ मित्रांचाही हात

गुन्हा दाखल होऊनही पुणे ग्रामीण पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. तसेच आरोपी पोलीस कॉन्स्टेबलची कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नाही. यानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत होत्या. मात्र आता पुणे ग्रामीण पोलिसांनी कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांना अटक केली आहे.

Pune Crime : पार्टीत दारू पिऊन कॉन्स्टेबल तर्राट! नशेत गाडी चालवत ६ वाहनांना धडक, पोलीस अटकेत
Patra Chawl Crisis : पत्राचाळ पुनर्विकासात पुन्हा धोक्याची घंटा! ११व्या मजल्यावरून प्लास्टर कोसळले, रहिवाशांचा कंत्राटदारावर संताप

पुणे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामे यांनी रविवारी दारूच्या नशेत वाहन चालवत ५ ते ६ वाहनांना धडक दिली होत. या धडकेत अनेक जण गंभीर झाले. याप्रकरणी इनामे यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय हेमंत इनामे यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात येणार असल्याचं पोलिस अधीक्षक गिल यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com