Pune Crime  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Pune Godman News : आर्टिफीशीअल इंटिलिजन्सच्या जगात उच्च शिक्षित लोकही भोंदूबाबाच्या भूलथापांना बळी पडत आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातल्या एका दाम्पत्याला तब्बल 14 कोटींचा गंडवलंय. पाहूया या दाम्पत्याची कोणत्या कारणावरुन आणि कोणी फसवणूक झालीये ? या खास रिपोर्टमधून

Snehil Shivaji

तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल तर बुवा बाबांच्या अजिबात नादी लागू नका. तुम्ही जर अशी चूक केली तर तुम्हाला बेघर होऊन रस्त्यावर यावं लागेल रस्त्यावर.. होय आम्ही जे म्हणतोय ते अगदी खरंय. पुण्यातली ही घटना ऐकून तुमच्या पायाखालची वाळू सरकेल.

इंग्लंडमधील आयटी कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी अंजलीनं दिव्यांग मुलींना बरं करण्यासाठी जंग जंग पछाडलं. दरम्यान त्यांची भेट दीपक खडके याच्याशी परिचय झाला.

खडकेनं वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर या दाम्पत्याच्या अंगात शंकर महाराज येत असल्याचं डोळस दाम्पत्याला सांगितलं. वेदिकानंही अंगात शंकर बाबा आल्याची अॅक्टिंग करत मुलींचा आजार बरं करणार असल्याचं सांगितलं. आणि इथून सुरू झाला लुटीचा प्रकार....

डोळस दाम्पत्यानं रोख रक्कम, एलआयसीमधील गुंतवणूक तसंच बचत योजनांमधील ठेवी, म्युचअल फंड, प्रॉव्हिडंट फंड, इंग्लडमधील घर, फार्म हाऊस, पुण्यातील 2 फ्लॅट, गावाकडील घर, शेत विकून गेल्या तीन वर्षात तब्बल १४ कोटींची आपल्या आयुष्याची सर्व पुंजी पंढरपूरकरांना दिली.

मात्र मुली बऱ्या होत नसल्याचं पाहून फसवणूक झाल्याचं डोळस दाम्पत्याचं लक्षात आलं....त्यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.

भोंदूबाबा असलेल्या दाम्पत्यानं बंगला घेतल्याचं समोर आलंय. तर पीडित डोळस दाम्पत्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आलीय. परदेशात राहणाऱ्या उच्च विद्या विभूषितांना जर असे अनपढं भोंदू कोट्यावधींना लुटत असतील तर आपण प्रत्येकानं श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक ओळखणं अत्यंत गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT