PUNE CONGRESS DUAL CITY PRESIDENT CONTROVERSY CREATES INTERNAL RIFT Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Politics : काँग्रेस पक्षात मानापमान नाट्य, अध्यक्षपदावरून नेत्यांमध्ये नाराजी

Pune Congress Political News : पुणे काँग्रेसमध्ये दोन शहराध्यक्षांच्या नियुक्तीमुळे अंतर्गत नाराजी वाढली असून पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे संघटनात्मक आव्हाने अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील काँग्रेसमध्ये दोन शहराध्यक्ष नियुक्तीमुळे वाद निर्माण

  • पदभार देण्याच्या प्रक्रियेत गोंधळ उघड

  • ज्येष्ठ नेत्यांकडून दुहेरी नेतृत्वाला विरोध

  • संघटनात्मक स्थैर्यावर प्रश्नचिन्ह

  • पुढील काळात पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेकडे लक्ष

सागर आव्हाड, पुणे

काँग्रेस पक्षात सध्या पुण्यातील शहराध्यक्ष पदावरून मानापमानाचे राजकारण रंगताना दिसत आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने काँग्रेसने शहरासाठी दोन स्वतंत्र शहराध्यक्षांची नियुक्ती केली असली, तरी या निर्णयामुळे अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. पश्चिम भागासाठी माजी आमदार दीप्ती चौधरी यांची, तर पूर्व भागासाठी प्रशांत जगताप यांची शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पक्षाच्या वाढीसाठी आणि स्थानिक पातळीवर संघटन बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दुहेरी नियुक्तीमुळे पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवड जाहीर झाल्यानंतर लगेचच विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी शहराचा पदभार दीप्ती चौधरी यांच्याकडे सोपवला. मात्र, त्या वेळी प्रशांत जगताप यांनी पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन शहराध्यक्ष नेमले असताना एकाच व्यक्तीकडे आधी पदभार देण्याचा निर्णय का घेतला, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, आज या दोन्ही नव्या शहराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र, या सोहळ्याच्या आधीच निर्माण झालेल्या वादामुळे कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मतभेद अधोरेखित झाले आहेत. पक्षातील अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की, शहरासाठी एकच अध्यक्ष असावा. दुहेरी नेतृत्वामुळे निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तर काहींनी या निर्णयाचे समर्थन करत, अंतर्गत वाद टाळण्यासाठीच दोन शहराध्यक्ष नेमल्याचे सांगितले.

तथापि, प्रत्यक्षात मात्र या निर्णयामुळेच पक्षात नाराजी वाढल्याचे दिसून येत आहे. पदभार देण्यापासूनच वादाला सुरुवात झाल्याने काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हाने अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आगामी काळात पक्ष नेतृत्व या परिस्थितीवर कसे नियंत्रण मिळवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT