IAS Pooja Khedkar And Pune Collector Suhas Diwase Saam Tv
मुंबई/पुणे

IAS Pooja Khedkar: सुहास दिवसे यांनी माझा लैंगिक छळ केला, IAS पूजा खेडकर यांची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

साम टिव्ही ब्युरो

नितीन पाटणकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस आधिकारी पुजा खेडकर यांच्या प्रकरणात ऐक नवीन ट्विस्ट आला आहे. पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला आहे. पोलिस सूत्रांनी मंगळवारी सायंकाळी ही माहिती दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा खेडकर यांची पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्याविरोधात वाशिम पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दिवसे यांनी लैगिंक आणि मानसिक छळ केल्याचा तक्रारीत पुजा खेडकर यांनी आरोप केल्याची माहिती आहे. ⁠वाशिम पोलिसांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुजा खेडकर यांची तक्रार नोंदवून घेतली आहे.

मात्र दिवसे यांच्याविरोधातील तक्रार वाशिम पोलीसांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, सरकारने मंगळवारी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित केलं आहे. त्यांना 23 जुलैपर्यंत लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. नागरी सेवा परीक्षेत निवड होण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर आहे.

पूजा खेडकर या खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरल्याने चर्चेत आल्या. नंतर हे प्रकरण खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र इथपर्यंत पोहोचलं. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Ast 2024: बुध ग्रहाची अस्त स्थित पडणार महागात; 'या' राशींना आर्थिक नुकसानासह कामात येणार अडथळे

Maharashtra Politics: आमदार अपात्रता प्रकरणावर आज 'सर्वोच्च' सुनावणी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आज फैसला होणार?

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबर अमेरिका दौऱ्यावर

Anil Bonde News: 'राहुल गांधींची जीभ छाटू नये, चटके द्यायला हवे', भाजप खासदाराचे खळबळजनक विधान

Green Road Place: कपल्सला भुरळ घालणारे ठाण्यातील प्रसिद्ध ठिकाण; एकदा गेलात की परत जाल

SCROLL FOR NEXT