Ravindra Dhangekar Saam TV marathi
मुंबई/पुणे

...तोपर्यंत पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार नाही, शिंदेंच्या शिलेदाराची खरमरीत टीका, सायकल चालवण्याचा दिला सल्ला

Pune traffic congestion political reaction : पुण्यातील वाहतूक कोंडीवर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार टीका केली आहे. जोपर्यंत नेते स्वतः वाहतूक कोंडीत अडकत नाहीत तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही, असा टोला त्यांनी नेत्यांना लगावला.

Akshay Badve

पुण्यातील वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न आहे. जोपर्यंत नेते मंडळी वाहतूक कोंडीमध्ये अडकणार नाहीत, तोपर्यंत त्यावर मार्ग निघणार नाही. नेत्यांनी आता पुण्यात फिरताना दुचाकी नाही सायकलवर यावं, अशी टीका शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. पुणे महापालिकेची यंदाची निवडणूक ही वाहतूक कोंडी या विषयाला धरूनच लढली जाईल. शहरात कुठेही फिरायचे असेल तरी त्रास होतो, शहरातून बाहेर जाण्यासाठी २ तास लागतात. वाहतूक कोंडी त्यासोबत वी आय पी आणि नेत्यांच्या दौऱ्यामुळे पुणेकरांना होणारा त्रास यावर तात्काळ उपाययोजना राबवणं गरजेचे असल्याचं ते म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीत शहरातील वाहतूक कोंडी आणि ती सोडवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न हेच मुद्दे प्रामुख्याने असतील असं मत पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, "पुणे शहरात वाहतूक कोंडीचा मुद्दा आणि त्याने होणाऱ्या समस्या हा गंभीर प्रश्न बनत आहे. सातत्याने त्याविषयी अनेक लोकं विविध प्रश्न मांडतात पण त्याने मूळ प्रश्नावर कुठल्या ही पद्धतीने उत्तरं मिळत नाहीत. शहरातून फेर फटका मारायचा असेल तर एक तास किमान लागतो तर शहरातून बाहेर जाण्यासाठी तब्बल २ तास लागतात."

"मागे एकदा एकनाथ शिंदे साहेब चांदणी चौकाच्या वाहतूक कोंडीत अडकले होते आणि त्यानंतर त्यांनी तात्काळ तो पूल तोडण्याचे आदेश दिले आणि आता वाहतूक तिथे सुरळीत झाली आहे. त्यामुळे पुण्यात जोपर्यंत अशा पद्धतीने नेते मंडळी वाहतूक कोंडीत स्वतः अडकत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी सुटणार नाही. नेत्यांनी चारचाकी नाही दुचाकी नाही थेट सायकलवर पुण्यात प्रवास करावा," असा उपहासात्मक सल्ला त्यांनी लगावला.

महापालिका आयुक्त यांना सक्तीच्या रजेवर पाठवा

पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम नियम धाब्यावर बसवून कामकाज करत असल्याने त्यांना निवडणूक आयोगाने सक्तीच्या रजेवर पाठवावं अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी मागणी केली आहे. "मतदार यादीत होत असलेला गोंधळ याला पूर्णपणे महापालिका आयुक्त जबाबदार आहेत. आम्हाला निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी अशी अपेक्षा आहे पण गेल्या काही दिवसांपासून त्यात गोंधळ सुरू आहे. आमची मागणी आहे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून दुसरा चांगल्या अधिकाऱ्याची नेमणूक तिथे व्हावी."

निवडणुकीची तयारी सुरूच आहे ती थांबली नव्हती

काँग्रेसकडून आमदार राहिलेले रवींद्र धंगेकर यंदा महापालिका निवडणूक लढवणार नाहीत अशी शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी त्यांच्या चिरंजीवाला "लाँच" करायचं ठरवलं आहे. प्रणव धंगेकर असे रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचे नाव असून त्याच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. पालिका निवडणुकीच्या तयारीबद्दल विचारले असता ते म्हणाले, "मी आमदार राहिलेलो आहे आणि आता तरुण पिढीला संधी देण्यात यावी. मी तयारी माझी कधीच बंद केली नव्हती माझी तयारी २४ तास असते."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT