Pune Chandan Nagar Oxygen Park murder case details Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात रक्तरंजित थरार! गर्लफ्रेंडच्या भावाला रस्त्यातून हटवलं, २९ वार करत घेतला जीव

Pune Chandan Nagar Murder Case Update : पुण्यातील चंदननगरमध्ये प्रेमप्रकरणातून लखन बाळू सकट याची ऑक्सिजन पार्कमध्ये निर्घृण हत्या झाली. मुख्य आरोपी यश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी २९ वार केले.

Namdeo Kumbhar

Pune Chandan Nagar murder : पुण्यातील चंदननगर भागात प्रेमप्रकरणातून झालेल्या वादामध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. लखन बाळू सकट याला विश्वासाने पार्कात भेटण्यासाठी बोलवले अन् काटा काढला. त्याच्यावर २९ वार केल्याची माहिती समोर आली आहे. मृत लखन याच्या मावस बहिणीच्या प्रियकराने मित्रांसोबत मिळून हे भयंकर कृत्य केल्याचं समोर आले आहे. चंदननगर पोलिसांनी या घटनेनंतर अवघ्या काही तासात सहा फरार संशयितांना अटक केली.

पुण्यातील चंदननगरमधील तरुणाच्या खूनप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. प्रेमसंबंधातील वादातून तरुणाचा शनिवारी खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. लखन बाळू सकट (वय १८, रा. चंदननगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी लखनचा काका केशव बबन वाघमारे (वय ३२) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रथमेश शंकर दारकू (वय २०), यश रवींद्र गायकवाड (वय १९), जानकीराम परशुराम वाघमारे (वय १८), महादेव पांडुरंग गंगासागरे (वय १९) आणि बालाजी आनंद पेदापुरे (वय १९) (सर्व रा. बोराटे वस्ती, चंदननगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून लखन आणि आरोपी यश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता. शनिवारी सायंकाळी यशने लखनला ऑक्सिजन पार्क परिसरात बोलावून घेतले. त्यावेळी झालेल्या वादातून यश आणि त्याच्या साथीदारांनी लखनला बेदम मारहाण करून तीक्ष्ण हत्याराने वार केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या खूनप्रकरणात इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

प्रेम प्रकरणाच्या वादात जीव गेला

१८ वर्षाचा लखन उर्फ ​​सोन्या बाळू सकट हा चंदननगरमधील आंबेडकर कॉम्प्लेक्समध्ये राहतो. मुख्य आरोपी यश रवींद्र गायकवाड (१९) याचे लखनच्या मावस बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. लखन यशला त्याच्या बहिणीपासून दूर राहण्यासाठी आणि हे नाते संपुष्टात आणण्यासाठी सतत आग्रह करत होता. याच कारामुळे यश आणि लखन यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. यशचा पारा चढला, त्याने मित्राच्या मदतीने लखनचा काटा काढण्याचा प्लान आखला. त्याने लखनला भांडणं सोडवण्यासाठी ऑक्सिजन पार्कात बोलवले. यश आणि त्याच्या मित्रांनी लखनवर धारदार शस्त्रांनी २९ वार केले. या हल्ल्यात लखनचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Minister Gogawale Video: शिंदेसेनेच्या आमदारानंतर मंत्र्यावर कॅशबॉम्ब, दळवींनंतर गोगावलेंचा नोटांच्या बंडलांचा व्हिडिओ

Maharashtra Politics: राजकारणातील अजून एक घर फुटणार? शिंदे गटातील माजी मंत्र्याच्या मुलाने धरली भाजपची वाट

Car Accident: भरधाव कारची उभ्या असलेल्या वॅगनआर कारला धडक, टक्कर होताच दोन्ही वाहनांनी घेतला पेट, ५ जणांचा मृत्यू

विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा; शासनाच्या परिपत्रकामुळे दलालांना चाप?

वैद्यकीय चाचणीत कॅन्सर झाल्याचं समजलं; कंपनीनं कर्मचाऱ्याला थेट कामावरुन काढलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT