

अंबादास दानवे यांनी कॅश बंडलचे ३ व्हिडिओ पोस्ट केले.
व्हिडिओत दळवी यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती दिसतोय.
महेंद्र दळवी यांनी आरोप नाकारत दानवे ब्लॅकमेल करत असल्याचा पलटवार केला.
दोन्ही गट आमनेसामने येत प्रकरणाने महाराष्ट्रात मोठी राजकीय चर्चा रंगली आहे.
Ambadas Danve allegations on MLA full details : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केलाय. दानवे यांनी एक्सवर पैशांच्या गड्ड्यांसह ३ व्हिडिओ पोस्ट केले. त्या व्हिडिओत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती दिसत आहे. समोरील बाजूला लाल शर्टवर एक व्यक्ती दिसत आहे. त्या व्यक्तीकडे पैशांचे बंडल दिसत आहेत. अंबादास दानवे यांनी पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतात? तो आमदार कोण आहे? असा सवाल एक्सवर विचारला. महेंद्र दळवी यांनी दानवे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याशिवाय दानवे यांना ब्लॅकमेल करण्याशिवाय आता कोणतेही काम उरलेले नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अंबादास दानवे यांनी एक्स खात्यावर ३ व्हिडिओ एकाचवेळी पोस्ट केले. त्यामध्ये पैशांचे बंडल दिसत आहेत. त्याशिवाय लाल शर्टवरील व्यक्ती (चेहरा दिसत नाही) पैसे मोजत असताना दिसतोय. तर दुसऱ्या एका व्हिडिओत दळवी यांच्यासारखा दिसणारा व्यक्तीही दिसत आहे. त्यामुळे महेंद्र दळवी यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. दानवे यांनी हे व्हिडिओ पोस्ट करत असतानाच मुख्यमंत्री आणि अमित शाह यांना सवाल केला. "या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?" असा सवाल दानवेंनी एक्सवर केला आहे.
दानवेंच्या आरोपाला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी प्रत्युत्तर देत आपल्यार आरोप फेटाळले आहेत. व्हिडिओमधील व्यक्ती मी नाहीच, असे ते म्हणाले. दानवे यांनी महाराष्ट्राला पुरावा दाखवावा. तो मीच आहे का? काय बोलतोय? हे महाराष्ट्राला कळले पाहिजे, असे महेंद्र दळवी म्हणाले. अंबादास दानवे यांना आता कोणताही कामधंदा उरलेला नाही. ब्लॅकमेल करणं हा त्यांचा धंदा आहे. त्यांनी महाराष्ट्राला पुरावे दाखवावेत. मी उद्या असेच आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचा फोटो व्हिडिओ टाकेल, चालेल का? असेही ते म्हणाले.
दानवेंचा ब्लॅकमेल करणं हा धंदा आहे. विरोधी पक्षाला आता कुठेही काम उरलेले नाही. या व्हिडिओत मी नाही. हा व्हिडिओत कोण आहे, ते अंबादास दानवे यांना विचारावे. त्या फोटो-व्हिडिओतील व्यक्तीचे म्हणणे काय आहे.. हे महाराष्ट्राला कळावे. विधिमंडळात अधिवेशनात याबाबत मी प्रश्न विचारणार आहे. अंबादास दानवेंच्या मागे कोण आहे? सुपारी कुणी दिली, त्यांचा बोलवता धनी कोण आहे? हे लोकांना समजलं पाहिजे, असे महेंद्र दळवी म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.